
असं म्हणतात की, प्रेमाला कशाचीही गरज नसते. कोणती जात, कोणता देश या सगळ्याने प्रेमात काहीच फरक पडत नाही. गुजरातमधील सुरत इथेही असाच प्रकार समोर आलाय. इथे पान विकणाऱ्या एका दिव्यांग तरुणाने फेसबुकवर फिलिपिन्समधील एका महिलेशी मैत्री केली. गोष्ट इतकी पुढे गेली की दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आता हे दोघंही 20 नोव्हेंबरला लग्न करणार आहेत.
दोघांची लव्हस्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. दहावी पास झालेल्या सुरतच्या तरुणाला इंग्रजी भाषाही येत नव्हती. पण असं म्हणतात की, प्रेम हे सर्वकाही शिकवतं.
त्याने भाषांतर ॲप्लिकेशनच्या माध्यमातून फेसबुकवर दोघांमध्ये चॅटिंग झालं आणि काही वर्षांनी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ही महिला लग्नासाठी सुरतला आलये. कारण इथेच दोघंही लग्न करणार आहेत.
सुरत मधील पान दुकान चालवणारे कल्पेश भाई मावजीभाई कच्छडिया हे अपंग आहेत. त्यांना चालता येत नाही. ४३ वर्षीय कल्पेश यांच्या पश्चात दोन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे.
त्याच्या कुटुंबातील सर्वजण विवाहित आहेत. अपंग असल्याने कल्पेशला लग्न करायचे नव्हते.
2017 मध्ये त्याला फेसबुकवर रेबेका नावाच्या 42 वर्षीय महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. कल्पेशला इंग्रजी येत नव्हते, त्यामुळे रेबेकाचा मेसेज आला की तो मित्रांना विचारून इंग्रजीत उत्तर द्यायचा.
रेबेका लॉकडाऊनमुळे भारतात येऊ शकली नाही. ती शारीरिकदृष्ट्या अपंग आहे. तिच्या पतीचे निधन झाले असून ती आता एकटी असल्याचेही रेबेकाने त्याला सांगितले.
दोघं एकमेकांच्या इतक्या जवळ आले की एकमेकांच्या प्रेमात पडले. रेबेका आणि कल्पेश गेल्या 5 वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात आहेत.
दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं होतं. त्यामुळे रेबेकानेही २०२० मध्ये भारतात येण्याची योजना आखली होती. त्याचे तिकीटही बुक झाले होते.
पण दरम्यानच्या काळात 24 मार्च 2020 रोजी देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. यामुळे ती भारतात येऊ शकली नाही.
दोघेही एकमेकांच्या संपर्कात राहिले. यावेळी रेबेकाने भारतात येऊन कल्पेशशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. ऑक्टोबर २०२२ मध्ये रेबेका दिवाळीच्या दिवशी भारतात आली होती. दोघेही एकमेकांना भेटून खूप खूश होते.
कल्पेशने रेबेकाची घरच्यांशी ओळखही करून दिली. त्यानंतर घरच्यांनीही दोघांच्या लग्नाला होकार दिला. आता हे दोघंही भारतीय परंपरेनुसार २० नोव्हेंबरला लग्न करणार आहेत.