Video : मांजराचा स्वॅग पाहिला का?, सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड व्हायरल
मांजरीचा हा अतिशय गोंडस व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 70 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 3 लाखांहून अधिक लाईक्स आणि 44 हजारांहून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत.

प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. त्यात कुत्रा आणि मांजर यांचे व्हिडिओ सर्वाधिक लोकप्रिय होतात. त्यांच्या गोंडस हालचाली आणि स्वॅगने लोकांची मने जिंकतात. मांजरी देखील पाळीव कुत्र्यांसारख्या आहेत, त्यांना काही शिकवले तर ते लवकर शिकतात. जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ पहा. सध्या एका मांजरीचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्हाला मांजर अनेकांना हाय-फाय देताना दिसेल.
काय आहे व्हिडिओत?
ही क्लिप केवळ 4 सेकंदाची आहे. मात्र या क्लिपमध्ये कॅट स्वॅग पाहण्यासारखा आहे. व्हिडिओमध्ये मांजर एका जागी बसलेली दिसत आहे, तर काही लोक धावत जाऊन त्याला हाय-फाइव्ह देताना दिसत आहेत. विशेष म्हणजे मांजरही आपले पंजे वर करून हाय-फाइव्ह देत आहे.
हा व्हिडिओ पाहून असे वाटते की मांजर या लोकांना प्रोत्साहन देत आहे आणि त्यांना म्हणत आहे, होय तुम्ही बरोबर जात आहात. तुम्ही करू शकता.
व्हिडिओला 70 लाखांहून अधिक व्ह्यूज
मांजरीचा हा अतिशय गोंडस व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 70 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 3 लाखांहून अधिक लाईक्स आणि 44 हजारांहून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत. ही संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
व्हिडिओवर अनेक कमेंट्स
एका युजरने कमेंट करत लिहिले आहे, भाऊ अशा मांजरी कुठे मिळतात, मला पण एक हवी आहे. दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, मांजरीला प्रशिक्षकाची नोकरी मिळाली आहे. अन्य एका युजरने कमेंटमध्ये लिहिले आहे की, मांजरी खूप गोंडस असतात. एकूणच या मांजरीच्या व्हिडिओने लोकांचे खूप मनोरंजन केले आहे.
