T 20 World Cup भारत पाकिस्तान मॅच! भारत पाकिस्तान मॅच पाहणार नाही, आनंद महिंद्रा यांचं खास ट्विट

रोहित शर्मा (कप्तान), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, आर अश्विन, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह ही भारतीय टीम आज मैदानात आहे.

T 20 World Cup भारत पाकिस्तान मॅच! भारत पाकिस्तान मॅच पाहणार नाही, आनंद महिंद्रा यांचं खास ट्विट
Anand mahindra tweet on Ind Vs Pak
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 23, 2022 | 4:44 PM

T 20 world cup सध्या ऑस्ट्रेलियात होत आहे. आज या स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आमने-सामने आहेत. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या बहुचर्चित सामन्यासाठी क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांनी लक्ष वेधले आहे. त्याचप्रमाणे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही या खास सामन्यासाठी खास तयारी केली आहे. मी फक्त संध्याकाळच्या निकालाच्या बातमीची वाट पाहत आहे, असं ते म्हणाले.

सामन्यापूर्वी आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत म्हटले आहे की, नेहमीप्रमाणेच मी #IndiavsPakistan सामन्यासाठी सज्ज आहे. मी माझा अँटी झिंक स्प्रे, स्ट्रेस-एंटी बॉल आणि मोती माझ्याजवळ ठेवले आहेत. तसंच माझा टीव्हीही आता बंद आहे. मी फक्त संध्याकाळच्या निकालाच्या बातमीची वाट पाहत आहे. एकूणच आनंद महिंद्रा यांनी या सामन्याबाबत उत्सुकता व्यक्त केली आहे.

रोहित शर्मा (कप्तान), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, आर अश्विन, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह ही भारतीय टीम आज मैदानात आहे.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितने सांगितले की, भारतीय संघ आज 7 फलंदाज, एक अष्टपैलू आणि तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरत आहे.