AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : “गुरुजी छडी नका मारू जी, लागतंय हातावरी”, शिक्षकांचा हा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

अन भाऊजी… हात नका लाऊजी, पाहिल कुणीतरी… ही लावणी किंवा गाणे तुमच्यापैकी सगळ्यांनी ऐकले असेल. मात्र या गाण्याच्या चालीवर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठीचा ध्यास काही शिक्षक मंडळींनी घेतला आहे.

Viral Video : “गुरुजी छडी नका मारू जी, लागतंय हातावरी”, शिक्षकांचा हा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
“गुरुजी छडी नका मारू जी, लागतंय हातावरी”, शिक्षकांचा हा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल Image Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jul 10, 2022 | 9:53 AM
Share

मुंबई – सोशल मीडियाचा (Social Media) लोक वापर करायला लागल्यापासून अनेक गोष्टी व्हायरल झाल्या आहेत. तसेच रातोरात काही लोक सोशल मीडिया स्टार झाल्याचं आपणं पाहिलं आहे. मागच्या तीन दिवसांपासून सोशल मीडियावर शिक्षकांचा (Teacher Group) एक व्हिडीओ लोकांच्या अधिक पसंती पडला आहे. अनेकांनी त्यावर कमेंट केली आहे. तर अनेकांनी तो व्हिडीओ आवडल्याचे सांगितले आहे. “छडी नका मारू – गुरुजी लागतंय हातावरी असं त्या गाण्याचं बोल आहे. एक शिक्षिका त्यांच्या सुंदर आवाजात ते गात आहे. त्यानंतर त्यांच्यासोबत असलेले सगळे ते म्हणतं आहेत. नेमका हा व्हिडीओ (Viral Video) कुठला आहे अद्याप माहिती पडलेलं नाही. परंतु व्हिडीओची चर्चा मात्र सगळीकडे आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

अन भाऊजी… हात नका लाऊजी, पाहिल कुणीतरी… ही लावणी किंवा गाणे तुमच्यापैकी सगळ्यांनी ऐकले असेल. मात्र या गाण्याच्या चालीवर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठीचा ध्यास काही शिक्षक मंडळींनी घेतला आहे. “अहो गुरुजी… छडी नका मारू जी, लागतंय हातावरी”, असे म्हणत विद्यार्थ्यांमध्ये एका वेगळ्याच पध्दतीने प्रबोधन केले जाणार आहे. आणि त्याच्याच सरावाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे.

विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारे शिकवून त्यांचे प्रबोधन करत आहे

.एका शाळेच्या वर्गातील हा व्हिडीओ असल्याचं दिसतंय. जिथं लहान लहान मुलं नसून खुप सारे शिक्षक दिसत आहेत. आता हा व्हिडीओ चर्चेत येण्याचं कारण म्हणजे इथं शिक्षकांची विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत आहे. या व्हिडीओत मात्र शिक्षिका बाकीच्या शिक्षकांना शिकवत आहे. खरं पाहिलं तर प्रत्येक शाळेची, शिक्षकांची शिकवण्याची वेगवेगळी पद्धत असते. काही शिक्षक तर इतक्या वेगळ्या पद्धतीने शिकवतात ज्याचा कुणी विचारही करू शकत नाही. अशाच शिक्षकांपैकी हा एक शिक्षक मंडळींचा ग्रुप आहे, जो आपल्या विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारे शिकवून त्यांचे प्रबोधन करत आहे. यांच्याच शिकवण्याच्या हटके शैलीमुळे हा शिक्षक ग्रुप फेमस झाला आहे. आता त्यांनी या व्हिडीओत नेमकं काय सांगितले आहे, हे तुम्हीही बघा आणि आपल्या मुलांनाही दाखवा. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या.

Follow Us
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न...
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न....
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ.
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स.
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा.
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे..
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची....
महाराष्ट्र हादरलं! रविवारची रात्र ठरली काळरात्र; 3 अपघातांत 17 जणांचा
महाराष्ट्र हादरलं! रविवारची रात्र ठरली काळरात्र; 3 अपघातांत 17 जणांचा.
10 दिवसांत चौथ्यांदा दरवाढ; पेट्रोल-डिझेलने गाठला उच्चांक, नविन दर काय
10 दिवसांत चौथ्यांदा दरवाढ; पेट्रोल-डिझेलने गाठला उच्चांक, नविन दर काय.
तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक
तिकीटासाठी नाही; पण दिल्लीला जातोय! गिरीश महाजनांचा अप्रत्यक्ष टोला नक.
पुस्तक वाचलं तरी आहे का?, फक्त कव्हर बघून बोलतात; दानवेंचा संजय.....
पुस्तक वाचलं तरी आहे का?, फक्त कव्हर बघून बोलतात; दानवेंचा संजय......