AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत पेट्रोल, डिझेल संपलं? अनेक पेट्रोल पंपावर फक्त CNG, इंधन टंचाईची राजधानीला झळ!

राज्यभरात इंधनाचा तुटवडा निर्माण झालेला आहे. पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढलेला असताना ते वेळेवर मिळतही नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. इंधन टंचाईची झळ आता मुंबईलाही बसत आहे.

मुंबईत पेट्रोल, डिझेल संपलं? अनेक पेट्रोल पंपावर फक्त CNG, इंधन टंचाईची राजधानीला झळ!
mumbai petrol and diesel crisisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 25, 2026 | 2:52 PM
Share

Mumbai Petrol Diesel Crisis : इराण-अमेरिकेच्या युद्धामुळे सध्या जगात उर्जेचं मोठं संकट निर्माण झालं आहे. भारतात तर आतापर्यंत चार वेळा पेट्रोल आणि डिझेलची किंमत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे या युद्धाची थेट झळ आता सामान्यांना सोसावी लागत आहे. भारतात आता पेट्रोल आणि डिझेलची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. काही ठिकाणी तर एक-एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. पावसाळा जवळ आल्याने ट्रॅक्टरद्वारे शेतीच्या मशागतीसाठी इंधनाची गरज आहे. परंतु इंधनाची टंचाई असल्याने ग्रामीण भागात असलेल्या पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांचीही मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. दरम्यान, इंधन टंचाईची झळ अगोदर छोट्या शहरांपर्यंत होती. आता हा तुटवडा थेट मुंबईपर्यंत पोहोचला आहे. राज्याची राजधानी मुंबईलाही इंधन टंचाईची झळ सोसावी लागत आहे.

मुंबईत पेट्रोल, डिझेल टंचाईची झळ

मिळालेल्या माहितीनुसार राजधानी मुंबईत अनेक पेट्रोल पंप बंद आहेत. सायनमधील अनेक पेट्रोल पंप इंधन नसल्याने बंद ठेवण्यात आले आहेत. परळ येथील उड्डाण पुलाखालच्या पेट्रोल पंपावरही पेट्रोल मिळेनासे झाले आहे. सायनच्या पेट्रोल पंपावर फक्त सीएनजी उपलब्ध आहे. येथे पेट्रोल, डिझेल तसेच पॉवर पेट्रोल हे सकाळी दहा वाजेपासून उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आलेले आहे. सायनच्या पेट्रोल पंपावर सीएनजीसाठीदेखील वाहनांची रांग लागल्याचे दिसत आहे. इंधनच नसल्याने सायन येथील पेट्रोल पंपावरील कर्मचारी बसलेले दिसत आहेत.

पेट्रोल, डिझेलची टंचाई नाही

दरम्यान, एकीकडे राज्यभरात इंधनाचा तुटवडा निर्माण झालेला असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. परंतु दुसरीकडे राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कुठेही कमतरता नाही, असा दावा सरकाकडून केला जात आहे. पेट्रोल, डिझेलचा कुठेही साठा करून टेवू नये, इंधनाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करू नये, असे आवाहन सरकारने केलेला आहे. परंतु प्रत्यक्ष मात्र पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात लोकांच्या रांगा दिसत आहेत. त्यामुळे आता सध्या राज्यात निर्माण झालेल्या इंधन तुटवड्यावर सरकार नेमका काय तोडगा काढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
Big Breaking | विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या राष्ट्रवादीत चाललंय तरी काय?
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना फोन केला अन्...
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...
Aaditya Thackeray | दानपेटीची चोरी करणाऱ्यांसोबत जाणार का? भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना आदित्य ठाकरेंचा सवाल
भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
Pune | पुण्यात आज भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर..
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात मुख्यमंत्र्यांसह...
आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली; पालखी मार्गावर..
Alandi | पालखी मार्गावर महिलेचा हायव्होल्टेज राडा! आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या 4 बड्या नेत्यांनी घेतली CM फडणवीसांची भेट, काय झाली चर्चा?
कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर शेतकऱ्यांचं झाडावर चढून आंदोल
Mumbai Farmer Protest | शेतकऱ्यांचा संताप शिगेला! कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर झाडावर चढून आंदोलन
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने
वसई-विरारच्या पुरावरून विधानसभेत राडा! आदित्य ठाकरे-भातखळकर आमनेसामने