Video | मासे पकडण्यासाठी लहान मुलाने तयार केलाय देशी जुगाड, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सुध्दा…

Viral Video | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये एक छोटा मुलगा मासे पकडण्यासाठी कशा पद्धतीने जुगाड करतोय हे पाहायला मिळत आहे. हे सगळं पाहिल्यापासून युजर्स...

Video | मासे पकडण्यासाठी लहान मुलाने तयार केलाय देशी जुगाड, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सुध्दा...
viral video
Image Credit source: twitter
| Updated on: May 01, 2023 | 10:59 AM

मुंबई : मासे पकडणं (Jugaad Viral Video) सगळ्यात अवघड काम आहे. ग्रामीण भागात नदीला किंवा ओढ्याला, तलावात किंवा पाण्याच्याा ठिकाणी अनेकजण मासेमारी करतात. मासे पकडणे व्हिडीओत पाहतो तितके सोप्पे नाही. कित्येक तास एकाचं ठिकाणी थांबल्यानंतर एखादा मासा (Fish) सापडतो. खरंतर मासे पडण्याचं काम एकदम बोरिंग काम असल्याचं अनेकजण सांगतात. दुसरीकडे, फिशिंग रॉडद्वारे एकच मासा त्या जाळ्यात अडकतो, तेव्हा हे काम सर्वात जास्त थकवणारे ठरते. सध्या एका छोट्या मुलाचा एक व्हि़डीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. एक मुलगा मोठ्या देशी जुगाड करुन मासे पकडत आहे. हा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे.

खरंतर लोकं नदी किंवा तलावाच्या ठिकाणी मासे पकडतात. काहीवेळेला माशांनी अधिक जोर लावल्यामुळे ते आपल्या हातातून निसटून जातात. त्यामुळे मासे पकडत असताना अनेकदा आपल्याला अपयश येतं. खरंतर यावर उपाय म्हणून एका लहान मुलाने एक देशी जुगाड तयार केला आहे. त्यामुळे मोठे-मोठे मासे पकडण्यात त्या मुलाला यश आलं आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर त्या मुलाचा जुगाड तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.

मासे पकडण्याचा जुगाड

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ सोशल मीडियाच्या काही प्लॅटफॉर्मवरती शेअर केला आहे. हा व्हिडीओ ट्विटरवरती एका बेस्ट पेज नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक मुलगा तलावाच्या बाजूला बसून जुगाड यंत्र बसवत आहे. त्या मुलाने दोन मोठ्या जाडजूड काठ्या लावून माझांने फीट केलं आहे. त्या काठ्या जमिनीला एकदम घट्ट केल्या आहेत. त्यामुळे त्या मुलाला मासे पकडत असताना अधिक त्रास होत नाही.

व्हिडीओ दोन मिलियन लोकांनी पाहिला

मासे पकडण्यासाठी जो गळ तयार केला आहे, तो मुलगा पाण्यात फेकतो. गळ फेकल्यानंतर तो मुलगा तिथं वाट पाहत बसतो. ज्यावेळी मासे त्या गळाला लागल्याची जाणीव होते, त्यावेळी तो गळ बाहेर काढतो. त्या मुलाचा मासे पकडण्याचा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे. अनेक नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये सांगितलं आहे, की आम्ही सुध्दा अशा पद्धतीने प्रयत्न करु. आतापर्यंत हा व्हिडीओ २४ लाख लोकांनी पाहिला आहे.