AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात सर्वात जास्त मोबाईल या पट्ट्याकडे, गिनिज बुकात गेलंय नाव

जगात अनेकांना जुन्या वस्तू जमविण्याचा छंद असतो तसा तुर्कस्थानातील एका व्यक्तीला मोबाईलचा संग्रह करण्याचा छंद जडला आहे. त्याच्याकडील मोबाईलची संख्या इतकी जास्त जितके तुमच्याकडे कपडे नसतील.

जगात सर्वात जास्त मोबाईल या पट्ट्याकडे, गिनिज बुकात गेलंय नाव
turkey manImage Credit source: socialmedia
| Updated on: Apr 16, 2023 | 5:40 PM
Share

नवी दिल्ली :  कोणाला पेन जमविण्याचा छंद असतो, तर कुणाला पोस्टाची तिकीटे तर कुणाला माचिसचे बॉक्स किंवा जुनी नाणी जमविण्याचा छंद असतो. परंतू मोबाईल सारख्या महागड्या वस्तू जमविण्याचा छंद कुणाला असेल असे तुम्हाला वाटले होते का ? काही जण दोन किंवा फार तर तीन मोबाईल फोन जवळ बाळगत असतात. परंतू आता एकाच मोबाईलमध्ये अधिक सिमकार्ड टाकता येत असल्याने तोही त्रास वाचला आहे. परंतू एका छंदीष्ठाचा मोबाईल जमविण्याचा छंद त्याला गिनिज बुकात घेऊन गेला आहे.

आजकाल मोबाईल शिवाय आपले पानही हलत नाही. मोबाईलशिवाय लोकांना काही मिनिटेही राहवत नाही. आता तर रोटी, कपडा आणि मकानच्या तालावर मोबाईलपण एक मुलभूत गरज बनली आहे. परंतू जगात अनेकांना जुन्या वस्तू जमविण्याचा छंद असतो तसा तुर्कस्थानातील एका व्यक्तीला मोबाईलचा संग्रह करण्याचा छंद जडला आहे. या वेडाने त्याचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविले गेले आहे. तुर्कीत राहणाऱ्या या व्यक्तीला अजब छंद जडला आहे. या व्यक्तीला मोबाईलचे कलेक्शन करण्याचा छंद जडला आहे. या पट्ट्याचे नाव एक्रेम कारागुदेकोग्लू असे आहे. या व्यक्तीकडे एवढे चालू कंडीशनमधील मोबाईल आहेत. की तुम्ही तोंडात बोट घालाल. एखाद्याकडे  दोन किंवा फार तीन मोबाईल असू शकतील परंतू या व्यक्तीकडे चक्क 2,779 मोबाइल फोन जमले आहेत.

एक्रेमच्या नावावर त्यामुळे जगात सर्वात जास्त मोबाईल फोनचे कलेक्शन असल्याचा रेकॉर्ड नोंदला गेला आहे. लोकांनी दोन किंवा तीन फोन सांभाळणे कठीण असताना याच्याकडे तर मोबाईलचा खजिनाच उपलब्ध झाला आहे. गिनिज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डच्या ऑफिशल साईटवर त्याच्या मोबाईल फोनच्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

एक्रेमजवळ जवळपास 150 वेगवेगळ्या मॉडेलचे मोबाईल फोन आहेत. आणि एकूण 2779 मोबाईल फोन आहेत. ज्याची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. एक्रेनला मोबाईल एवढे का आवडतात असे जाणण्याची प्रत्येकाची इच्छा आहे. एक्रेमने मोठ्या प्रमाणात असलेला मोबाईल संग्रहाला म्युझियमचे रूप दिले आहे. ग्रंथालयातील पुस्तकांना जसे नंबर लिहीलेले असतात तसे त्याने मोबाईलला दिले आहेत. त्यासाठी स्टीकर लावले आहेत. या स्टीकरवर मोबाईल मॉडेल क्रमांक लिहीले आहेत. एक्रेम पेशाने सेलफोन रिपेअरींग करणारे आहेत. टेक्निशियन म्हणून काम करताना त्यांना मोबाईल कलेक्शन करण्याचा छंद लागल्याचे ते म्हणतात. त्यांचे हे कलेक्शन वाढतच गेले आणि त्यांच्या आता छोट्या ब्रॅंडपासून मोठ्या ब्रॅंडचे मोबाईल फोन उपलब्ध आहेत.

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.