AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : हवेत उडणारी जगातील पहिली बाईक आली, व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांचा विश्वास…

सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होतात. त्यापैकी काही व्हिडीओ लोकांच्या अधिक पसंतीला पडतात. सध्या हवेत बाईक फिरत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.

VIDEO : हवेत उडणारी जगातील पहिली बाईक आली, व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांचा विश्वास...
Flying BikeImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Mar 18, 2023 | 2:36 PM
Share

मुंबई : मागच्या कित्येक वर्षांपासून लोक भविष्यात हवेत चालणारी बाईक (Flying Bike) कशी असेल याची कल्पना करीत आहेत. त्याचबरोबर अनेकांनी त्याबाबत स्वप्न सुध्दा रंगवली आहेत. काही लोकांनी स्वत:च्या कारला एखाद्या बाईकप्रमाणे तयार केलं आहे. हवेत उडणारी कारचं सु्द्धा अनेक स्वप्न पाहत आहेत. फ्लाइंग कार (Flying Car)हे आजही अनेकांचे स्वप्न असले तरी उडणारी बाईक नक्कीच नाही. सोशल मीडियावर असे रोज असंख्य व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतात. त्यापैकी हा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

जपानच्या एक कंपनीने अशा पद्धतीच्या बातम्या दिल्या

जपानच्या स्टार्ट-अप AERWINS ने XTURISMO नावाच्या फ्लाइंग बाईक तयार केल्याच्या ठळक बातम्या दिल्या आहेत. हवेत उडू शकणारी ही हॉवरबाईक असून संपूर्ण जगातील पहिली उडणारी बाईक म्हणून ओळखली जाईल अशा पद्धतीच्या बातम्या देण्यात आल्या आहेत. हॉवरबाईक सध्या जपानमध्ये विक्रीसाठी आहे. AERWINS चे CEO ही बाईक युनायटेड स्टेट्समध्ये विकण्याची योजना आखत असल्याची माहिती मिळाली आहे.

बटन दाबल्यानंतर काही सेकंदात ती बाईक

XTURISMO एका व्हिडीओने सोशल मीडियावर तुफान राडा घातला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक व्यक्ती त्या बाईकमध्ये बसल्याचं दिसत आहे. तर दुसरा कित्येक अंतरावरुन हे सगळं दृष्य पाहत आहे. बाईक चालवण्यासाठी जो पुरुष बसला आहे. त्या बटन दाबल्यानंतर काही सेकंदात ती बाईक हवेत उडायला सुरुवात करते. हा व्हिडीओ @entrepreneursquote इन्स्टाग्रामरती शेअर केला आहे. खरंतर हा व्हिडीओ @xturismo_official यांच्याकडून अपलोड करण्यात आला होता.

व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी म्हणतात…

सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होतात. त्यापैकी काही व्हिडीओ लोकांच्या अधिक पसंतीला पडतात. सध्या हवेत बाईक फिरत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर नेटकरी सुध्दा त्या व्हिडीओच्या खाली कमेंट करुन अनेक प्रश्न विचारत आहेत.

Follow Us
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत