VIDEO : दारुच्या नशेत करायला एक आणि झालं भलतंच, नेटकरी म्हणतात वाचला की गेला?

वैजंता गोगावले, Tv9 मराठी

|

Updated on: Nov 04, 2022 | 11:21 PM

मद्यपी तरुणाने जीवघेणा स्टंट केला. तिथल्या लोकांना हा स्टंट पाहताना किती धक्का बसला असेल याचा अंदाज लावता येणार नाही. सोशल मीडियामध्ये याबाबत अनेक रंजक कमेंट्स नोंदवल्या जात आहेत.

VIDEO : दारुच्या नशेत करायला एक आणि झालं भलतंच, नेटकरी म्हणतात वाचला की गेला?
स्टंटबाजी करणे तरुणाला महागात पडले
Image Credit source: social

दारूच्या नशेत कोण काय करेल याचा नेम नसतो. अनेक मद्यपींना तर आपण दारू प्यायला म्हणजे डोंगर उचलून घेऊ शकतो असा भास होतो. अर्थात दारूची नशा म्हणजे एक वेगळं विश्वच असते. मद्यपान करणाऱ्यांना या विश्वाची अनुभूती असते. त्यामुळेच मद्यपी दारूच्या नशेत काहीही करायला तयार होतो. सोशल मीडियामध्ये असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे की लोक क्षणाक्षणाला पोट धरून हसत आहेत. दारूच्या नशेत एक तरुण चक्क पायऱ्यांच्या शेजारी लावलेल्या रेलिंगवर घसरगुंडी करू लागतो.

अवघ्या काही सेकंदात त्याचा हा प्रयत्न फसतो आणि तो काही मजले खाली धडकन कोसळतो. त्यात त्या तरुणाला किती मार लागला असेल हे त्यालाच ठाऊक. पण सध्या त्याच्या व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियामध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला आहे एवढे मात्र खरे.

 

हे सुद्धा वाचा

View this post on Instagram

 

A post shared by Drunk People Doing Things (@drunkpeopledoingthings)

तरुण जिवंत आहे की प्राण गमावला?

तरुणाने भले दारूची नशा केली असेल, पण काही मजल्यावरून खाली कोसळल्यामुळे त्याला जबर मार लागला असावा. सोशल मीडियातील व्हायरल व्हिडिओमध्ये अपघाताची तीव्रता लक्षात येत आहे.

तरुणाने दारूच्या नशीब नको ते कृत्य केले आणि जीवावर नसते संकट ओढून घेतले. एवढ्या उंचावरून कोसळल्यानंतर तो आश्चर्यकारकपणे वाचला आहे की त्याला या अपघातात प्राण गमवावा लागला, हे मात्र उघड झालेले नाही.

व्हिडिओवर रंजक कमेंट्सचा पाऊस

मद्यपी तरुणाने जीवघेणा स्टंट केला. तिथल्या लोकांना हा स्टंट पाहताना किती धक्का बसला असेल याचा अंदाज लावता येणार नाही. सोशल मीडियामध्ये याबाबत अनेक रंजक कमेंट्स नोंदवल्या जात आहेत.

काहींच्या अंगावर काटा उभा राहतो आहे, तर काही लोक या व्हिडिओकडे एक धमाल घटना म्हणून पाहत आहेत. त्यामुळे व्हिडिओची लोकप्रियता दिवसागणिक वाढल्याचे दिसून येत आहे.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI