
अत्यंत कमी खर्च आणि निसर्गरम्य वातावरणात कुटुंबासोबत वेळ घालवायचा असेल तर मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे हे ठिकाण. जाताच प्रेमात पडाल.

जर तुम्ही देखील आपल्या कुटुंबासोबत सुट्टीसाठी सर्वात स्वस्त आणि मुंबईपासून जवळ असणारे ठिकाण शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

आज आम्ही तुम्हाला सर्वात अशा ठिकाणांबाबत सांगणार आहोत, जिथे तुम्ही आपल्या कुटुंबासोबत मनसोक्त सुट्टीचा आनंद घेऊ शकता. कोणती आहेत ती ठिकाणे?

माथेरान- थंडीच्या दिवसांमध्ये माथेरान हे फिरण्यासाठी खूप सुंदर ठिकाण आहे. येथील वातावरण आणि छोट्या ट्रेनमध्ये बसून तेथील परिसर पाहण्यासारखा आहे. त्यासोबत तिथे राहण्याची देखील खास सोय आहे.

अलिबाग- जर तुम्हाला कुटुंबासोबत बीचवर जायचे असेल तर सर्वात सुंदर ठिकाण म्हणजे अलिबाग. हे मुंबईपासून जवळ आहे. तुम्ही तिथे बोटीने जाऊ शकता. त्यामुळे खर्च देखील कमी येईल.

खंडाळा- लोणावळा आणि कर्जतच्यामध्ये असणारे खंडाळा हे देखील पर्यटकांसाठी फिरण्यासाठी खास ठिकाण आहे. तेथील सौंदर्य हे पर्यटकांना खूपच आकर्षित करते. तिथे तुम्ही व्हिला बुक करून कुटुंबासोबत सुट्टीचा आनंद घेऊ शकता.