Video : खिडकीतून घरात घुसत चोरट्यानं पोलिसांना दाखवला डेमो, यूझर्स म्हणाले…

लोक आपल्या घराच्या सुरक्षेसाठी जाड दरवाजे आणि लोखंडी खिडक्या लावतात, पण त्या लोखंडी खिडक्यांमधून चोर शिरून चोरी करतात. ऐकायला थोडं विचित्र वाटतं, पण असाच एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला हे खरं वाटू लागेल.

Video : खिडकीतून घरात घुसत चोरट्यानं पोलिसांना दाखवला डेमो, यूझर्स म्हणाले...
खिडकीतून घरात शिरतानाचं प्रात्यक्षिक दाखवताना चोर
| Updated on: Jan 18, 2022 | 9:19 AM

जगात गुन्हेगारी (Crime) आणि गुन्हेगारांची कमी नाही. खून हा एक गंभीर गुन्हा आहे. पण दरोडा आणि चोरी हे असे दोन गुन्हे आहेत, ज्यांची प्रकरणं जगभर रोज पाहायला मिळतात. विशेषत: चोरीबद्दल बोलायचं झालं, तर जगात अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्याबद्दल जाणून घेऊन आपण आश्चर्यचकित होतो. जगात एकापेक्षा एक असे चोर आहेत, जे चोरीचे अनोखे मार्ग अवलंबतात आणि अतिशय सफाईनं चोरी करतात, ज्याची माहिती आजूबाजूच्या घरातल्या लोकांनाही नसते. लोक आपल्या घराच्या सुरक्षेसाठी जाड दरवाजे आणि लोखंडी खिडक्या लावतात, पण त्या लोखंडी खिडक्यांमधून चोर शिरून चोरी करतात. ऐकायला थोडं विचित्र वाटतं, पण असाच एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडिया(Social Media)वर खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला हे खरं वाटू लागेल.

लाइव्ह डेमो

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक चोर खिडकीच्या साहाय्यानं सहज घरात प्रवेश करतो. हा डेमो असला तरी पोलिसांच्या सांगण्यावरून चोर कसा चोरी करतो हे दाखवून दिलं आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय, की एक पोलीस चोराची हातकडी उघडतो, जेणेकरून तो आपलं ‘कौशल्य’ दाखवू शकेल. यानंतर चोर अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतो. तो खिडकीच्या रॉडमधून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो आणि अगदी सहजतेनं खिडकीच्या छोट्या जागेतूनही घरात प्रवेश करतो.

ट्विटर हँडलवर व्हिडिओ शेअर

आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा मजेदार व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलंय, की ‘हा चोर खिडकीतून घुसला’. 1 मिनिट 4 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 5 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी व्हिडिओला लाइकदेखील केलं आहे.


विनोदी कमेंट्स

व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूझरनं लिहिलंय, की ‘न्यायाधीशजी शंका आहे, की एवढ्या लहानशा जागेमधून कोणी कसं प्रवेश करू शकतं’, तर दुसर्‍या यूझरनं विनोदी पद्धतीनं टिप्पणी केली, की हे सोपं काम नाही… याला मेहनत लागते.

Viral Video : कोणत्या मित्रांपासून दूर राहावं? जाणून घ्या, फक्त 5 सेकंदांत…

Viral : जुगाडवाली ‘हायटेक’ सायकल, Video पाहून टेस्लाचे इंजिनियर्सही होतील थक्क

Viral : आपल्या ताकदीनं सर्वांना धडकी भरवणारा शक्तीशाली मुलगा आज नाही हयात… काय घडलं? वाचा सविस्तर