Viral : आपल्या ताकदीनं सर्वांना धडकी भरवणारा शक्तीशाली मुलगा आज नाही हयात… काय घडलं? वाचा सविस्तर

Viral : आपल्या ताकदीनं सर्वांना धडकी भरवणारा शक्तीशाली मुलगा आज नाही हयात... काय घडलं? वाचा सविस्तर
Dzhambulat Khatokhov

रशियन सुमो (Sumo) कुस्तीपटू 'जगातील सर्वात बलवान मूल' म्हणून ओळखलं जातं; तो आता नाही. होय, जेव्हा तो नऊ वर्षांचा होता, तेव्हा त्याचं वजन 146 किलो होतं. परंतु वयाच्या 21व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.

प्रदीप गरड

|

Jan 18, 2022 | 7:30 AM

रशियन सुमो (Sumo) कुस्तीपटू ‘जगातील सर्वात बलवान मूल’ म्हणून ओळखलं जातं; तो आता नाही. होय, जेव्हा तो नऊ वर्षांचा होता, तेव्हा त्याचं वजन 146 किलो होतं. परंतु वयाच्या 21व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. Dzhambulat Khatokhovनं आपल्या तरुण वयात मोठं यश संपादन केलं होतं. जगभरातले लोक त्याला सर्वात शक्तिशाली बालक म्हणत, पण त्याचे मित्र त्याला ‘ग्लॅडिएटर’ म्हणत. वयाच्या तिसर्‍या वर्षी त्यानं लोकांचं लक्ष वेधून घेतलं. या वयात Dzhambulatनं ‘जगातला सर्वात बलवान मुलगा’ हा किताब पटकावला.

गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

वयाच्या तिसऱ्या त्याचं वजन 48 किलो होतं. त्यांच्या नावावर गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सची नोंद झाली. जन्मावेळी त्याचं वजन केवळ 2.89 किलो होते, परंतु वयाच्या अवघ्या पहिल्या वर्षी त्याचं वजन सुमारे 13 झालं. यामुळे वजन वाढण्याची प्रक्रिया थांबली नाही, जसजसं वय वाढू लागलं, तसतसं वजनही वाढू लागलं. जेव्हा तो 6 वर्षांचा झाला तेव्हा त्याचं वजन 95 किलो झालं. पुढे जेव्हा तो 9 वर्षांचा झाला तेव्हा वजन 146 किलो झालं.

सर्वच चिंतीत

वाढत्या वजनामुळे, त्याला सुमो कुस्तीमध्ये रस येऊ लागला आणि स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागला. त्याचे प्रशिक्षक Khasan Teusvazhukov यांनी त्याला लढण्यासाठी तयार केलं, परंतु प्रशिक्षणादरम्यान त्याच्या वाढत्या वजनाबद्दलही ते चिंतित होते. कारण जेव्हा तो 17 वर्षांचा झाला तेव्हा त्याचं वजन 230 किलो झालं. डॉक्टरही त्याला वजन कमी करण्याचा सल्ला देऊ लागले. यानंतर मुलानं वजन कमी करण्याचा निर्णय घेतला आणि लवकरच त्यानं दीड वर्षात सुमारे 176 किलो वजन कमी केलं.

आईनं फेटाळले आरोप

Dzhambulatनं त्याच्या कुस्तीदरम्यान अनेक स्पर्धा जिंकल्या. मुलाला सुमो रेसलर बनवण्यासाठी लहानपणी स्टेरॉईडची औषधे दिल्याचा आरोपही मुलाच्या आईवर करण्यात आला. मात्र आई नेल्यानं ही गोष्ट साफ नाकारली आणि सांगितलं, की आई आपल्या मुलाशी असं करू शकते का? तिनं सांगितलं, की जेव्हा तो 5 वर्षांचा होता, तेव्हा त्याला वैद्यकीय चाचणीसाठी मॉस्कोला नेण्यात आलं होतं, परंतु तपासणीत सर्व काही सामान्य होतं आणि ती पूर्णपणे निरोगी होता. आई नेल्या म्हणाली, ‘माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे आहेत आणि मी माझ्या मुलासोबत असे कधीही करू शकत नाही.’

Viral होत असलेल्या ‘या’ फोटोमध्ये दडलंय मुलीचं नाव, उत्तर द्या आणि बघा किती जीनियस आहात?

Video | कशाला हवी मोठी गाडी? मुंब्य्रातली पोरं म्हणतात, आमची अ‍ॅक्टिवाच भारी! आता घडणार जेलवारी?

Video | मांजरींना कुशीत घेऊन झोपणाऱ्यांनो, हा वनरक्षक बघा! चक्क बिबटेच वनरक्षकाच्या कुशीत शिरले

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें