Viral : जुगाडवाली ‘हायटेक’ सायकल, Video पाहून टेस्लाचे इंजिनियर्सही होतील थक्क

Viral : जुगाडवाली 'हायटेक' सायकल, Video पाहून टेस्लाचे इंजिनियर्सही होतील थक्क
जुगाडवाली सायकल

ज्या लोकांकडे कल्पकता आहे (Jugaad) ते रद्दीतूनही आश्चर्यकारक गोष्टी बनवतात. अभियंते(Engineers)ही त्यांना पाहून थक्क होतात. देसी जुगाडपासून बनवलेल्या गोष्टींच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील, ही बातमीही त्याचाच एक भाग आहे.

प्रदीप गरड

|

Jan 18, 2022 | 8:27 AM

ज्या लोकांकडे कल्पकता आहे (Jugaad) ते रद्दीतूनही आश्चर्यकारक गोष्टी बनवतात. अभियंते(Engineers)ही त्यांना पाहून थक्क होतात. देसी जुगाडपासून बनवलेल्या गोष्टींच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील, ही बातमीही त्याचाच एक भाग आहे. जुगाड टेक्नॉलॉजी(Technology)चा असा हा नमुना आहे, जो पाहिल्यानंतर टेस्ला इंजिनीअरही क्षणभर थक्क होऊन जातील.

चाकावर पंखा

जुगाडपासून बनवलेल्या अनेक गोष्टी तुम्ही पाहिल्या असतील. इतकंच नाही तर अनेक वेळा तुम्ही हे ‘तंत्रज्ञान’ वापरलं असेल. पण, या काकांनी जुगाड करून सायकल हायटेक करून लोकांची मनं जिंकली आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका काकांनी जुगाडच्या माध्यमातून हाय टेक (Hi Teach Cycle) सायकल बनवली आहे. काकांनी बनवलेल्या या हायटेक सायकलमध्ये जुगाडच्या सहाय्यानं चाकावर पंखा बसवलाय, ज्यामुळे त्यांना जास्त मेहनत न करता सायकलचा वेग वाढवण्यास मदत होईल. काकांनी क्लिपमध्ये पंखा सुरू करताच सायकल आपोआप रस्त्यावर धावू लागते.

मजेशीर कमेंट्स

काकांचा हा जुगाड लोकांना खूप आवडतोय. यामुळेच अनेक यूझर्सनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका यूझरनं लिहिलंय, की मी ही हायटेक सायकल पाहून थक्क झालो आहे. त्याच वेळी, इतर यूझर्सनी लिहिलंय, की अंकलनं खरोखर चमत्कार केला आहे. आणखी एका यूझरनं लिहिलं, की ‘अंकलच्या टेक्नॉलॉजीनं टेस्लाच्या लोकांनाही विचार करायला लावलंय. याशिवाय इतर सर्व यूझर्स या काकांचं कौतुक करताना दिसत आहेत.

इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर

हा व्हिडिओ helicopter_yatra_नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यासोबतच हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तर सात लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइक केलं आहे.

Viral : आपल्या ताकदीनं सर्वांना धडकी भरवणारा शक्तीशाली मुलगा आज नाही हयात… काय घडलं? वाचा सविस्तर

Video | कशाला हवी मोठी गाडी? मुंब्य्रातली पोरं म्हणतात, आमची अ‍ॅक्टिवाच भारी! आता घडणार जेलवारी?

Kili Paul Video : किली पॉलचं ‘मैं जिस दिन भुला दू’ गाण्यावर लिपसिंक, जुबिन नौटियालनंही दिली दाद

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें