AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Instant कर्मा! डबल सीट बसून या महिलेने असा आगाऊपणा केला, “जैसे ज्याचे कर्म तैसे…”

नुकताच व्हायरल झालेला एक व्हिडिओ याच गोष्टीचं उत्तम उदाहरण आहे. एक मुलगी दुचाकीवर डबल सीट बसलेली असते. गाडीवरून जाताना...

Instant कर्मा! डबल सीट बसून या महिलेने असा आगाऊपणा केला, जैसे ज्याचे कर्म तैसे...
bike accidentImage Credit source: Social Media
| Updated on: Nov 08, 2022 | 11:29 AM
Share

कधी कधी काही लोक विचार न करता अशा गोष्टी करतात, ज्याचा वाईट परिणाम त्यांना सहन करावा लागतो. मात्र आजकाल लोक अशा घटनांना ‘इन्स्टंट कर्मा’ असं म्हणतात. म्हणजे एखाद्या सोबत तुम्ही काही वाईट केलंत तर तुमच्या सोबतही लगेच असंच काहीसं होतं. त्यामुळे इतरांच्या आयुष्यात जर तुम्ही विघ्न आणणार असाल तर थोडी काळजी घ्या नाहीतर तुम्हीही खड्ड्यात जाल. नुकताच व्हायरल झालेला एक व्हिडिओ याच गोष्टीचं उत्तम उदाहरण आहे. एक मुलगी दुचाकीवर डबल सीट बसलेली असते. गाडीवरून जाताना ती दुसऱ्या गाडीवरच्या महिलेला लाथ मारायला जाते. मग काय…इन्स्टंट कर्मा!

या व्हिडीओमध्ये दोन वाहने शेजारी-शेजारी रस्त्यावरून जाताना दिसत आहेत. रस्त्याच्या कडेला एक पुरुष चालक आणि एक महिला स्कूटी वरून जात आहेत, शेजारीच दुसरी दुचाकी आहे. ही दुचाकी दुसरी महिला चालवत आहे.

पुरुष ड्रायव्हरच्या मागे बसलेली महिला या दुसऱ्या दुचाकीवरच्या महिलेला लाथ मारताना दिसते. आरोपी महिला बाईकचा तोल बिघडवण्याचा प्रयत्न करत होती, मात्र असं करताना तिचा तोल गेला आणि ती टू-व्हीलरवरून खाली पडली.

इंटरनेटवर लोकांनी बाईकला लाथ मारणाऱ्या मुलीची खिल्ली उडवली, कारण ती लाथ मारल्यानंतर लगेचच स्कुटीवरून पडलीये.

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या महिलेला तिने लाथेने मारण्याचा प्रयत्न केला ती न थांबता पुढे गेली. एका युझरने व्हिडिओ पाहिल्यानंतर लिहिले, ‘याला म्हणतात इन्स्टंट कर्म’.

अनेक लोकांना ‘रोडरश’ या प्रसिद्ध व्हिडिओ गेमची आठवण झाली, कारण खेळात रेसिंग करताना अशीच परिस्थिती निर्माण होते. आणखी एका युझरने लिहिले की, “मुलीच्या बॅगने तिला गंभीर दुखापतीपासून वाचवलं.”

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.