
साप हे जगातील सर्वात धोकादायक जनावर म्हणून ओळखले जाते. कारण त्यांच्या विषारी दंशाने क्षणात माणसाचा मृत्यू होऊ शकतो. केवळ माणसेच नव्ह तर अनेक प्राणी देखील त्यांच्या विषामुळे मरतात. परंतू निसर्गात असे काही प्राणी आहेत, त्यांच्यावर सापाच्या विषाचा काही परिणाम होत नाही. यापैकी मुंगूस तर सर्वांनाच माहिती आहे. परंतू एक प्राणी असाही आहे जो सापाला जराही घाबरत नाही. अशा एका विचित्र पाण्याने सापाला चावून खाल्ल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या खतरनाक व्हिडीओ पाहून सर्व जण हक्काबक्का झाले आहेत. लोकांना प्रश्न पडला आहे की अखेर हा प्राणी कोणता आहे जो सापाच्या विषाला पचवतो.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकात की हा प्राणी त्याची शिकार शोधण्यात बिझी आहे. परंतू साप त्याच्यावर हल्ला करतो.त्यानंतर काय होते हे पाहणे महत्वाचे आहे. आपल्याला वाटते की सापाच्या दंशाने हा लहानगा प्राणी मृतप्राय होईल. परंतू घडते भलतेच हा प्राणी आपल्या अणुकूचीदार दातांनी या सापालाच खाऊन टाकतो.या लहान जीवाने थेट सापाच्या तोंडावर हल्ला केल्याचे दिसत आहे.त्यामुळे सापला वाचण्याचा कोणताही चान्स राहिलेला नाही. या प्राण्याचे नाव काही युजर्सनी ओलिंगुइटो असे म्हटले आहे. ही एक प्राण्याची नवीन जात आहे. या प्राण्याचा शोध २०१३ रोजी लागला. हा प्राणी कोलंबियापासून ते पश्चिमी इक्वेडोर पर्यंत मेघवन क्षेत्रात आढळतात.
या हैराण करणाऱ्या व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स ( ट्वीटर ) वर @TheeDarkCircle नावाच्या आयडीने शेअर केले आहे. केवळ १७ सेकंदाच्या या व्हिडीओला आता पर्यंत दीड लाख लोकांनी पाहिले आहे. शेकडो लोकांनी या व्हिडीओला लाईक्स देखील केले आहे. या व्हिडीओला अनेक युजरने प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत.
या व्हिडीओला पाहून एका युजरने हैराण होत लिहीले आहे की, ‘ज्या सापाला मनुष्यही घाबरतो,त्याला हा प्राणी असे चावून खात आहे जसा स्नॅक्स खात आहे. तर दुसऱ्या एका युजरने लिहीलेय की हा छोटा प्राणी खरोखरच जंगलाचा असली हिरो आहे. तर काहींनी मजेने लिहीलेय की या जनावरासाठी साप देखील फास्ट फूड सारखे आहे.’
येथे पाहा व्हिडीओ –
— Wildlife Uncensored (@TheeDarkCircle) September 16, 2025