Viral Video : झाडावरील आंबे काढण्यासाठी बायकोला उचलून घेतलं, मग काहीवेळाने…, असा मजेशीर व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल

Mango Viral Video | सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये पती आणि पत्नी आंबे तोडण्याचा प्रयत्न करीत आहे. हे सगळं सुरु असताना अचानक पतीचा पॅन्ट खाली सरकते. नेमकं काय झालंय पाहा व्हिडीओमध्ये...

Viral Video : झाडावरील आंबे काढण्यासाठी बायकोला उचलून घेतलं, मग काहीवेळाने..., असा मजेशीर व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल
Mango Viral Video
Image Credit source: tv9marathi
| Updated on: May 04, 2023 | 12:47 PM

मुंबई : आपल्याकडे कडक उन्हाचा सीजन सुरु झाल्यानंतर आंब्याचा (Mango Viral Video) सीजन सुरु होतो. अनेक राज्यात आंब्याची (Mango) झाडं अधिक आहेत. विशेष म्हणजे आपल्या देशातून परदेशात आंबा जात असल्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक अधिक फायदा होतो. आपण लहान मुलांना कच्चे आंब्यापासून ते पिकलेले आंबे खात असताना पाहतो. ग्रामीण भागात मुलं दगडाने आंबे पाडतात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाला आहे. त्यामध्ये पती आणि पत्नी झाडाचे आंबे तोडण्याचा प्रयत्न करीत आहे. आंबे तोडत असताना काय झालंय ते तुम्ही व्हिडीओत पाहू शकता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला सुध्दा हसू कंट्रोल होणार नाही एवढं मात्र निश्चित.

पॅन्ट कमरेतून खाली घसरते

सकाळी फिरायला गेलेले नवरा-बायको आंब्याचं झाडं पाहून थांबतात. त्याचबरोबर आंबे तोडण्याचा प्रयत्न करतात. आंब्याचं झाडं उंच असल्यामुळे नवरा बायकोला उचलून घेत आहे. त्याचवेळी जोर लावत असताना नवऱ्याची पॅन्ट कमरेतून खाली घसरते. त्यावेळी तिथं असलेल्या एका व्यक्तीने हा प्रकार मोबाईलमध्ये शूट केला आहे.

आंब्याच्या नादात पॅन्ट घसरली

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे की, ज्यावेळी नवऱ्याची पॅन्ट खाली घसरते. त्यावेळी तिथली लोकं जोरजोरात हसत आहेत. पती आपल्या पत्नीला खाली ठेवतो आणि पॅन्टवरती घेतो. पत्नी सुध्दा जोराची हसत आहे. ज्यांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. ते सगळे हसत आहेत.

सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ अधिक पाहिला

हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ अधिक पाहिला आहे.
इंस्टाग्रामवरती हा व्हिडीओ संदीप नामाच्या अकाऊंटवरुन व्हायरल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 25 लाख लोकांनी पाहिला आहे. त्यावर नेटकरी अधिक मजेशीर कमेंट करीत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘इज्जत गेली, तरीही काम झालं नाही.’ दुसर्‍याने लिहिले, ‘याला बायको उचलणे म्हणतात.’