AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देव तारी त्याला कोण मारी! अख्खी मालगाडी अंगावरून गेली पण पठ्ठ्याला खरचटलंही नाही..! पाहा Video

Train runs over man : राजस्थान(Rajasthan)मध्ये सवाई माधोपूर जिल्ह्यात काल रात्री उशिरा घडलेल्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ (Video) व्हायरल झाला आहे. अख्खी मालगाडी एका तरुणाच्या अंगावरून गेली आणि त्या तरुणाला ओरखडाही आला नाही.

देव तारी त्याला कोण मारी! अख्खी मालगाडी अंगावरून गेली पण पठ्ठ्याला खरचटलंही नाही..! पाहा Video
प्रातिनिधिक छायाचित्र
| Updated on: Feb 11, 2022 | 1:17 PM
Share

Train runs over man : दौसा (राजस्थान) : देव तारी त्याला कोण मारी ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरली आहे. राजस्थानमध्ये (Rajasthan) सवाई माधोपूर जिल्ह्यात काल रात्री उशिरा घडलेल्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ (Video) व्हायरल झाला आहे. अख्खी मालगाडी एका तरुणाच्या अंगावरून गेली आणि त्या तरुणाला ओरखडाही आला नाही. जिल्ह्यातील गंगापूर शहरातील करौली ते हिंडौन फाटक दरम्यान दिल्ली-मुंबई मेन लाइनवर एका तरुणाचा रेल्वेने (Railway) धडक दिल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण रेल्वे ट्रॅकच्या मधोमध बेशुद्ध पडलेला दिसत आहे आणि संपूर्ण मालगाडी त्यावरून जाताना दिसते. याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याही अंगाचा थरकाप उडेल. त्याला साधा ओरखडाही पडला नाही की जखमही झाली नाही.

मद्यधूंद अवस्थेत पडला

दालचंद महावर असे रेल्वे रुळावर पडलेल्या तरुणाचे नाव आहे. ज्याचे वय 27 वर्षे असून तो गंगापूर सिटी नसिया कॉलनी येथील रहिवासी आहे. दालचंद हा मद्यपी आहे. दारूच्या नशेत हा तरूण रेल्वे रुळ ओलांडत होता. आणि याच दरम्यान मद्यधुंद अवस्थेत तो रेल्वे रुळाच्या दोन्ही रुळांच्या मधोमध पडला. त्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली आणि तो इतका नशेत होता की तो पुन्हा उठू शकला नाही.

स्थानिकांनी रुग्णालयात केले दाखल

एक मालगाडी दिल्लीहून मुंबईकडे याचदरम्यान रुळावरून जात होती. हा तरूण रेल्वे रुळांच्या मधोमध पडला होता आणि संपूर्ण मालगाडी त्याच्या अंगावरून गेली. यादरम्यान तेथे बरेच लोक जमा झाले आणि तो तरुणाला दोन ट्रॅकमध्ये शांतपणे झोपण्याचा सल्ला देताना दिसले. मालगाडी पुढे गेल्यानंतर स्थानिक लोकांनी तरुणाला उचलून दुचाकीवरून गंगापूर शहरातील शासकीय रुग्णालयात नेले. (Video Courtesy – NBT)

आणखी वाचा :

Hijab : खान सिस्टर्सचा जलवा, एका बुलेटवर Hijab घालून चौघीजणी करतायत flying kiss; हा Video पाहिलात का?

Ratan Tata यांचा ‘तो’ कुत्रा, मिटिंगमध्येही असतो सोबत, मनोरंजक कथा Viral; वाचा सविस्तर

Stunt Viral Video : स्टंटबाजीची हवी डोक्यात गेली की ‘असं’ हसं होतं! 4 सेकंदांत जाणून घ्या Helmetचं महत्त्व

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.