दोन महिन्यांच्या माकडाच्या पिल्लाचा वाहनाने चिरडलेल्या आईला जिवंत करण्याचा प्रयत्न, VIDEO पाहून अनेकांचे डोळे पाणावले

मागच्या तीन दिवसात माकडाला चिरडण्याची ही दुसरी घटना आहे. कोकराझार जिल्ह्यातील नायकगांव परिसरात बुधवारी एका माकडाचा मृत्यू झाला होता.

दोन महिन्यांच्या माकडाच्या पिल्लाचा वाहनाने चिरडलेल्या आईला जिवंत करण्याचा प्रयत्न, VIDEO पाहून अनेकांचे डोळे पाणावले
viral story
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Feb 26, 2023 | 8:34 AM

आराम : सोशल मीडियावर (social media) एक व्हिडीओ व्हायरल (video viral) झाला आहे. हा व्हिडीओ आराम (Asam) राज्यातील असल्याचं एका वेबसाईटनं म्हटलं आहे. माकडाला एका वेगाने जाणाऱ्या वाहनाने धडक दिली, त्यानंतर त्या माकडाचा जागीचं मृत्यू झाला आहे. त्यावेळी दोन महिन्याचं माकडाचं पिल्लू आपल्या आईला जिवंत करण्याचा प्रयत्न करीत आहे. तिथं पाहणाऱ्या एका व्यक्तीने हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला आहे. त्याचबरोबर पाहणाऱ्यांचे डोळे सुध्दा पाणावले आहेत.

सुनहरा माकड नावाची एक जुनी प्रजाती आहे. पश्चिम आसाममधील एका छोट्या क्षेत्रात त्याचं प्रमाण अधिक आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी बोंगाईगांव जिल्ह्यातील काकोइजाना परिसरात एक माकड आणि तिचं पिल्लू काहीतरी खाण्याच्या उद्देशाने खाली उतरले होते. त्याचवेळी भरधाव निघालेल्या एका गाडीने मोठ्या माकडाला जोराची धडक मारली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये माकडाचं पिल्लू आपल्या आईला जिवंत करण्याचा प्रयत्न करीत आहे. आईच्या शेजारी ते माकड जवळपास एक तास बसल्याची माहिती तिथल्या लोकांनी सांगितली आहे. त्यानंतर तिथल्या स्थानिक लोकांनी त्याला हटवलं

मागच्या तीन दिवसात माकडाला चिरडण्याची ही दुसरी घटना आहे. कोकराझार जिल्ह्यातील नायकगांव परिसरात बुधवारी एका माकडाचा मृत्यू झाला होता.

काही तिथल्या तज्ज्ञाचा असं म्हणणं आहे की, तिथू जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी तिथली झाडं तोडण्यात आली आहेत. त्यामुळे दुसऱ्या झाडावर जाण्यासाठी तिथल्या माकडांना राष्ट्रीय महामार्ग ओलांडावा लागत आहे.  त्यामुळे तिथं अजून अपघात होण्याची शक्यता तिथल्या स्थानिकांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर त्या परिसरात गाडी शिस्तीत चालवण्याचं आवाहन सुध्दा करण्यात आलं आहे.