Maharashtra By Assembly Election 2023 Voting LIVE : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचं मतदान संपलं, आता निकाल 2 मार्चला

| Updated on: Feb 27, 2023 | 6:03 AM

Maharashtra By Assembly Election 2023 Voting LIVE : कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होत आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीच्या घडामोडी जाणून घेऊयात.

Maharashtra By Assembly Election 2023 Voting LIVE : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचं मतदान संपलं, आता निकाल 2 मार्चला
Maharashtra By Assembly ElectionImage Credit source: tv9 marathi

पुणे : कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. कसबापेठमध्ये भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडमध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या पोटनिवडणुका होत आहेत. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस तसेच राष्ट्रवादी आमनेसामने आहेत. या निवडणुकीत मनसेने भाजपला पाठिंबा दिला आहे. तर चिंचवडमध्ये वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा देऊन महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवली आहे. त्यामुळे या निवडणुकीची रंगत अधिकच वाढल्याने त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Feb 2023 05:59 PM (IST)

    कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचं मतदान संपलं

    पुणे :

    कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचं मतदान संपलं

    आता 2 मार्चला मतदानाचा निकाल

    चिंचवडमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 41,1 टक्के मतदान

    कसब्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 45.25 टक्के मतदान

  • 26 Feb 2023 05:40 PM (IST)

    खासदार गिरीश बापट यांनी बजावला मतदानाचा हक्क

    पुणे :

    खासदार गिरीश बापट यांनी बजावला मतदानाचा हक्क

    अहिल्याबाई देवी हायस्कूल मतदान केंद्रावर येत मतदान केलं

    ऑक्सिजन सिलेंडर सोबत घेऊन मतदानासाठी आले होते

    बोटावरील शाई दाखवतं त्यांनी मतदान केल्याचं दर्शवलं

    कार्यकर्त्यांची गर्दी यावेळी झाली होती

    कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणाबाजीही केली

  • 26 Feb 2023 03:03 PM (IST)

    गणेश बीडकरांना अटक करा

    काँग्रेसच्या शहराध्यक्षांची मागणी

    गुंड सोबत घेऊन पैसे वाटप केलं जातं होतं

    हटकलं असता मारहाण केल्याचा काँग्रेसचा आरोप

    जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनमधून हलणार नाही काँग्रेसचा पवित्रा ..

  • 26 Feb 2023 02:36 PM (IST)

    भाजपचं नाव आणि चिन्हं असलेला शेला परिधान करून मतदान, हेमंत रासने अडचणीत

    हेमंत रासने यांनी आज सकाळी मतदान केलं, त्यावेळीझाली चूक

    रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून रासने यांच्या कृतीवर आक्षेप, कारवाईची मागणी

    चुकून शेला गळ्यात राहिला, रासने यांचा खुलासा

  • 26 Feb 2023 01:25 PM (IST)

    चिंचवडमधील मतदान केंद्रावर अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार

    चिंचवड पोटनिवडणूकित चाललंय काय?

    मतदान केंद्रात मोबाईल वापरास परवानगी नसताना व्हिडीओ चित्रण होतेच कसे?

    मतदान केंद्रावरील अधिकारी तपासणी का करत नाहीत?

    चिंचवडमध्ये सुद्धा गोपनीय मतदान प्रक्रियेचा भंग

    मतदाराकडून ईव्हीएम मशीनवर असलेल्या चिन्हा समोरील बटण दाबून मतदान केल्याचा व्हिडिओ टीव्ही 9 मराठीच्या हाती

    निवडणूक विभाग काय कारवाई करणार? याकडे सगळ्यांचे लक्ष

  • 26 Feb 2023 12:33 PM (IST)

    चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकमध्ये 510 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरू

    255 मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे निवडणूक आयोगाची देखरेख

    दोन हजारपेक्षा जास्त मतदान मशीन मतदान केंद्रावर

    12 ते 13 इव्हिएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मशीन तत्काळ बदलल्या

  • 26 Feb 2023 11:42 AM (IST)

    चिंचवडमध्ये 8 ईव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड, मतदान रखडले

    ईव्हीएम मशीन बिघडलेल्या मतदान केंद्रांवर काहीकाळ थांबवावे लागले मतदान

    निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांच्या टीमने ईव्हीएम मशिन बदलल्या

    मतदानाला सुरळीत सुरुवात

  • 26 Feb 2023 11:36 AM (IST)

    कसबा-चिंचवड निवडणूकीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त

    चिंचवडमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 3.52 टक्के मतदान

    कसब्यामध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 6.5 टक्के मतदान

    निवडणूकीचा निकाल 2 मार्च रोजी लागणार

  • 26 Feb 2023 11:33 AM (IST)

    कसब्यात टिळक परिवाराने मतदानाचा हक्क बजावला

    कन्या शाळेतील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क

    शैलेश टिळक, चैत्राली टिळक आणि कुणाल टिळक यांनी केले मतदान

    दरवेळी मुक्ताताईंसोबत मतदान करायला जायचो, आज पहिल्यांदाच त्यांच्याशिवाय मतदान करत असल्याचं शैलेश टिळक म्हणाले.

  • 26 Feb 2023 10:32 AM (IST)

    कसब्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 6. 5 टक्के मतदान

    नागरिकांकडून मतदानाला अल्प प्रतिसाद

    कसब्यात खूप कमी मतदान झालं

    तिन्ही उमेदवारांनी मतदान केलं, पण मतदार घराबाहेर पडेना

    उमदेवारांची चिंता वाढली

  • 26 Feb 2023 10:00 AM (IST)

    भाजपचे माजी नगरसेवक सागर अंघोळकर आणि राहुल कलाटे समर्थकांमध्ये हाणामारी

    चिंचवड मतदारसंघातील पिंपळे गुरव मतदारसंघाबाहेर बाचाबाची

    पोलिसांनी जमावाला पांगवलं, पोलीस बंदोबस्त वाढवला

    पोलीस म्हणतात, सीरियस प्रकार नाही

  • 26 Feb 2023 09:30 AM (IST)

    मतदानासाठी ही तरुणी लंडन मँचेस्टर येथून थेट कसब्यात

    24 तासाचा प्रवास करून अमृता देवकर पोहोचल्या मतदानाचा हक्क बजवायला

    मला कळलं निवडणूक लागली आहे आणि मी लगेच माझा हक्क बजावण्यासाठी आले

    मतदान हा आपला अधिकार आणि तो हक्क आहे सगळ्यांनी तो केलाच पाहिजे

    आपल्याला पुढे जायचं असेल आपला देश पुढे न्यायचा असेल तर मतदानाचा हक्क सर्वांनी बजावला हाच संदेश देण्यासाठी मी इतक्या लांबून मतदानासाठी आले आहे

    अमृता देवकर यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया

  • 26 Feb 2023 09:20 AM (IST)

    हेमंत रासने यांनी मतदानाचा हक्क बजावला

    नुतन महाविद्यालयात बजावला मतदानाचा हक्क

    हेमंत रासने भाजपचे कसब्यातील उमेदवार

    मतदार आपल्याच विजयी करतील असा रासने यांचा विश्वास

    आपण महापालिकेत विविध पदावर असताना चांगली कामे केल्याने मतदार पोचपावती देतील, असा विश्वास

  • 26 Feb 2023 08:38 AM (IST)

    चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत नागरिक माझ्या बाजूने, राहुल कलाटे यांचा विश्वास

    जनतेने निवडणूक हातात घेतली आहे, मोठ्या फरकाने मला ही जनता विजयी करेल

    नागरिकांचा मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे

    खासदार अमोल कोल्हे मी जवळचे मित्र आहेत

    ते कामात व्यस्त असतील. त्यामुळे ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले नसतील

  • 26 Feb 2023 08:24 AM (IST)

    सर्वसामान्य जनता बरोबर असल्याने विजय निश्चित : अपक्ष उमेदवार राहुल कलाटे

    सर्वसामान्य जनता बरोबर असल्याने विजय निश्चित : अपक्ष उमेदवार राहुल कलाटे

    चिंचवड तिरंगी लढतीतील अपक्ष वंचित बहुजन पुरस्कृत उमेदवार राहुल कलाटे यांनी घेतले ग्रामदैवत म्हातोबा आणि आईचे आशीर्वाद

    यावेळी घरातील महिलांनी राहुल कलाटे यांच औक्षण करून विजयी भवच्या शुभेच्छा दिल्या

    7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे

    सर्व सामान्य जनता बरोबर असल्याने विजय निश्चित असल्याचा अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी विश्वास व्यक्त केला आहे

  • 26 Feb 2023 08:03 AM (IST)

    आज मी स्वत:ला मतदान केलं, भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचे भावूक उद्गार

    भाजपच्या चिंचवडच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी मतदानाचा हक्क बजावला

    महापालिका शाळेत बजावला मतदानाचा हक्क

    निवडणुकीत विकासाचा मुद्दाही उचलला होता, भावनिक मतेही मिळतील

    अश्विनी जगताप यांना विजयाची खात्री

  • 26 Feb 2023 07:31 AM (IST)

    चिंचवडमध्ये नाना काटे यांचे मतदान

    राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांचं मतदान

    देवदर्शनापूर्वी केलं मतदान

    भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप मतदानासाठी निघाल्या

    मतदानाला निघण्यापूर्वी अश्विनी जगताप यांचं औक्षण

  • 26 Feb 2023 07:21 AM (IST)

    रवींद्र धंगेकर यांनी मतदानाचा हक्क बजावला

    कसब्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

    मतदान करणाऱ्या उमेदवारांमध्ये धंगेकर पहिले

    देवदर्शनानंतर धंगेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • 26 Feb 2023 06:38 AM (IST)

    कसबा विधानसभा पोट निवडणूक रद्द करा, उमेदवार अभिजित बिचुकले यांची मागणी

    काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कसबा गणपती समोर केलेले उपोषण हा आचार संहिता भंग म्हणून या निवडणूक रद्द करण्याची मागणी

    दोन्ही पक्षांनी नियमांचा भंग केला

    अभिजीत बिचुकले यांनी थेट निवडणूक कार्यालयात जाऊन केली तक्रार

  • 26 Feb 2023 06:35 AM (IST)

    चिंचवड विधानसभा मतदारसंघातातील मतदानासाठी पिंपरी चिंचवड पोलीस सज्ज

    कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

    चिंचवडमध्ये 13 मतदान केंद्र संवेदनशील असून त्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे

    7 पोलीस उपायुक्त, 110 सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, 1100 पोलीस कर्मचारी, 275 होमगार्ड , 05 निमलष्करी दलाच्या तुकड्या, 1 सीआरपीएफ तुकडी असा बंदोबस्त ठेवला

  • 26 Feb 2023 06:29 AM (IST)

    कसब्यात 2 लाख 75 हजार 428 मतदार ठरवणार उमेदवारांचं भवितव्य

    कसब्यात महिला मतदार 1 लाख 38 हजार 550 आहेत

    पुरुष मतदार 1 लाख 36 हजार 873 आहेत

    तर तृतीयपंथी मतदार 5 आहेत

    एकूण मतदार केंद्र 76 आहेत

    एकूण बूथ संख्या 270 आहे

    9 मतदार केंद्र संवेदनशील आहेत

    मतदानासाठी 1300 पोलीस कर्मचारी तैनात

    एकूण 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत

    महविकास आघाडीचे रवींद्र धगेकर विरुद्ध भाजपचे हेमंत रासने यांच्यात मुख्य लढत आहे

  • 26 Feb 2023 06:22 AM (IST)

    कसबा आणि चिंचवडसाठी आज मतदान; थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात

    सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार

    कसबा आणि चिंचवडमध्ये भाजप आणि महाविकास आघाडीत मुख्य लढत

    मनसेचा भाजपला तर चिंचवडमध्ये वंचित आघाडीचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

    संपूर्ण राज्याचं लक्ष आजच्या निवडणुकीकडे

Published On - Feb 26,2023 6:19 AM

Follow us
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.