AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लंडनच्या राणीसाठी व्यापाऱ्यांनी बनविला होता अनोखा ज्युबली हीरा, टाटांनी विकत घेत पत्नीला गिफ्ट केला

साल 1897 मध्ये ब्रिटनची महाराणी क्वीन व्हीक्टोरीया यांची डायमंड ज्युबली होती. त्यांच्या सन्मानासाठी हीऱ्याचं नाव ज्युबली ठेवले. त्यावेळी हीऱ्याची मालकी लंडनच्या तीन व्यापाऱ्यांकडे होती.

लंडनच्या राणीसाठी व्यापाऱ्यांनी बनविला होता अनोखा ज्युबली हीरा, टाटांनी विकत घेत पत्नीला गिफ्ट केला
dorabji_tata_meherbaiImage Credit source: socialmedia
| Updated on: Aug 11, 2023 | 3:39 PM
Share

मुंबई | 10 ऑगस्ट 2023 : टाटा ग्रुपचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे थोरले पुत्र सर दोराबजी टाटा यांच्याकडे कोहीनूर पेक्षाही दुप्पट मोठा हीरा होता. जगातील सर्वश्रेष्ठ हीऱ्यांसाठी प्रख्यात असलेल्या दक्षिण आफ्रीकेतील ‘द जॅगर्सफोंटी माईन’ मधून आतापर्यंत 96 लाख कॅरेटहून अधिक हीरे तयार झाले आहेत. 1895 मध्ये या खाणीतून 245.35 कॅरेटचा चमकता हीरा निघाला. 1896 मध्ये त्याला पैलू पाडण्यासाठी अ‍ॅमस्टरडमला पाठविले गेले. एकीकडे लंडनच्या राणीकडे आपला कोहीनूर हीरा आहे. तर त्यापेक्षा दुप्पट मोठा हीराही लंडनच्या राणीलाच मिळणार होता. परंतू तो दोराबजी यांनी तो विकत घेत त्यांच्या पत्नीला गिफ्ट केला.

साल 1897 मध्ये ब्रिटनची महाराणी क्वीन व्हीक्टोरीयाची डायमंड ज्युबली होती. त्यांच्या सन्मानासाठी हीऱ्याचं नाव ज्युबली ठेवले. त्यावेळी हीऱ्याची मालकी लंडनच्या तीन व्यापाऱ्यांकडे होती. ते राणीला हा हीरा भेट देण्याच्या विचारात होते. परंतू नियतीच्या मनात वेगळेच होते. या हीऱ्याला साल 1900 मध्ये पॅरीसच्या प्रदर्शनात ठेवले होते. टाटा ग्रुपचे संस्थापक जमशेदजी यांचे पूत्र सर दोराबजी टाटा तेथे गेले होते. त्यांनी त्यास विकत घेण्याचे ठरविले.

हीऱ्याचा विमा काढला होता

दोराबजी टाटाचे मेहेरबाई यांच्याशी दोनच वर्षांपूर्वी 1898 मध्ये व्हेलेंटाईन डे ला लग्न झाले होते. त्यांनी ज्युबिली हीरा पत्नीला गिफ्ट देण्याचे ठरविले. पेंग्विन प्रकाशनच्या हरीश भट लिखित टाटा स्टोरीज या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे लंडनच्या व्यापाऱ्यांकडून एक लाख पाऊंडमध्ये हा हीरा खरेदी केला. मेहेरबाई यांच्या गळ्यातील कंठहाराची तो शोभा बनला. टाटांनी या हीऱ्याचा विमा काढला होता. त्यांनी लंडनच्या सेफ डीपॉझिट वॉल्टमध्ये हीऱ्याला ठेवले होते. मेहेरबाई जेव्हा त्याला परीधान करण्यासाठी बाहेर काढायच्या तेव्हा विमा कंपनी त्यांच्यावर 200 पाऊंडचा दंड लावायच्या.

कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी

जमेशदपूर येथील टाटा स्टील कंपनीवर आर्थिक संकट आले तेव्हा कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी साल 1924 या हीऱ्यांसह संपूर्ण संपत्ती इंपीरियल बॅंकेत गहाण ठेवली. इंपीरियल बॅंकेने त्याबदल्यात कर्ज मंजूर केले. टाटा स्टील पुन्हा उभी राहीली. दरम्यान 1931 मध्ये मेहेरबाई यांचे निधन झाले. पुढच्या वर्षी दोराबजीही गेले. त्यांनी आपली खाजगी संपत्ती टाटा चॅरिटेबल ट्रस्टला दान केली. त्यात ज्युबली हीराही होता. साल 1937 मध्ये हीरा विकून मिळालेले पैसे ट्रस्टला सोपविण्यात आले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.