बऱ्याच वर्षानंतर या मुलीला ऐकू आलं, व्हिडीओ भावुक करणारा
सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये मेडिकल सायन्सने एका मुलीला अशी भेट दिली, ज्यामुळे ती भावूक झाली आणि रडू लागली.

कल्पना करा की जर आपल्याला कधीच ऐकू येत नसेल तर? त्याहीपेक्षा खूप खूप वर्षांनी आपल्याला जर अचानक ऐकू आलं तर? कल्पनेपलीकडे आहे हे नाही का? सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये मेडिकल सायन्सने एका मुलीला अशी भेट दिली, ज्यामुळे ती भावूक झाली आणि रडू लागली. या मुलीला ऐकू येत नव्हते पण ती अचानक ऐकायला येऊ लागलं. हा सगळा मेडिकल सायन्सचा चमत्कार आहे.
खरंतर हा व्हिडिओ अनेक युझर्सनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेसाया असं या मुलीचं नाव असून ती केनियाची रहिवासी आहे.
तिचे वय सात वर्षे असल्याचे सांगितले जाते आणि तिला लहानपणापासून ऐकू येत नव्हते. अनेक वेळा कानाची शस्त्रक्रियाही झाली पण प्रत्येक वेळी अपयश आले आणि या मुलीला ऐकू येत नव्हते.
लहान वयात नेसायाची तब्येत बिघडली आणि त्यातच तिच्या कानाचे पडदे फाटले, असे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. ज्यामुळे त्याची श्रवणशक्ती हरपली होती. तेव्हापासून तिला ऐकू येत नव्हते.
पण या मुलीने हार मानली नाही किंवा तिच्या कुटुंबानेही हार मानली नाही. या व्हिडीओमध्ये मुलीच्या कानावर मशीन बसवण्यात आलंय.
खास करून या मुलीसाठी हे मशीन खूप दिवसांपासून तयार केलं जात होतं. मशीन बसवताच तिने वयाच्या सातव्या वर्षी पुन्हा ऐकण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर ती या व्हिडिओमध्ये खूप भावूक झाली.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये मुलगी खुर्चीवर बसली आहे आणि एक डॉक्टर तिच्या कानात मशीन फिट करत आहे. मशीन बसवल्यानंतर टाळ्या वाजवतात आणि मुलगी मागे वळून बघते. हा व्हिडिओ व्हायरल झालाय.
