Viral Video : डिमांडिंग आजीबाई स्मार्ट Alexa वरही भारी, केली एवढी डिमांड की Alexaचंही डोकं चक्रावलं!

एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक आजीबाई Alexaकडे आपल्या आवडत्या गाण्याची डिमांड करताना दिसत आहे.

Viral Video : डिमांडिंग आजीबाई स्मार्ट Alexa वरही भारी, केली एवढी डिमांड की Alexaचंही डोकं चक्रावलं!
सोशल मीडियावर आजीबाईंचा हा व्हिडीओ लोकांना चांगलाच आवडताना दिसतो आहे.

सोशल मीडिया कधी कुठले व्हिडीओ व्हायरल होतील सांगता येत नाही, कुणी केलेली मस्ती असतो, कुणाची झालेली फजिती असोत, कुणाचं काही स्किल असो वा अगदी रोजच्या आयुष्यातील काही गोष्टी. कधी कुणी सोशल स्टार बनेल हे आजच्या जगात सांगता येत नाही. यातील काही व्हिडीओ हसवतात, काही विचारात पाडतात तर काही डोकं चक्रावून टाकतात. असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक आजीबाई Alexaकडे आपल्या आवडत्या गाण्याची डिमांड करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल. ( Video of Grandmother Alexa demanding Ganpati Bhajan goes viral )

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक आजी टीव्हीजवळच्या एलेक्सा युनीटजवळ जाते. आणि तिच्याकडे काहीतरी डिमांड करते. यावेळी कदाचित आजीबाईचा मुलगा तिला डिमांड करण्यात मदत करतो. आजीबाई एलेक्साकडे डिमांड करत म्हणते, Alexa गणपती भजन, गणपती श्लोक बोलो, स्तुती बोलो, आरती बोलो, ओम गण गणपतये नम: बोलो

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Sharma (@lifeneedsaholiday)

सोशल मीडियावर आजीबाईंचा हा व्हिडीओ लोकांना चांगलाच आवडताना दिसतो आहे. लोक यावर अनेक मजेशीर प्रतिक्रीया देत आहे. यातील अनेकजण आजीबाईंना क्युट म्हणत आहेत. बरं यातील असेही अनेक लोक आहेत, जे अॅलेक्साचं उत्तर काय होतं हे जाणण्याचे इच्छुक आहेत. यातील एका युजरने लिहलं अॅलेक्सा म्हणाली असेल, हा आजीबाई मी तुमच्या सगळ्या डिमांड लिहून घेते.

हेही वाचा:

 

Video | एकमेकींना कडकडून मिठी मारताना दिसल्या दोन क्युट मांजरी, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात…

मुलाच्या अंगावर पडत होती भिंत, आईकडून छातीचा कोट, मुलगा वाचला, Viral Video पाहाच! 

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI