Video | एकमेकींना कडकडून मिठी मारताना दिसल्या दोन क्युट मांजरी, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात…

तुम्ही अनेक लोकांना एकमेकांना मिठी मारताना अनेक वेळा पाहिले असेल, पण तुम्ही कधी प्राण्यांना मिठी मारताना पाहिले आहे का? कदाचित नसेल.. आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये 2 मांजरी एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.

Video | एकमेकींना कडकडून मिठी मारताना दिसल्या दोन क्युट मांजरी, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात...
Cute Cat

मुंबई : तुम्ही अनेक लोकांना एकमेकांना मिठी मारताना अनेक वेळा पाहिले असेल, पण तुम्ही कधी प्राण्यांना मिठी मारताना पाहिले आहे का? कदाचित नसेल.. आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये 2 मांजरी एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. आम्ही तुम्हाला सांगू की ज्याप्रमाणे मनुष्यांमध्ये भावना असतात, त्याचप्रमाणे प्राण्यांमध्येही खूप भावना असतात. ते एकमेकांवरील प्रेम वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करतात. व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये पफिन आणि बिनक्स नावाच्या दोन अतिशय गोंडस मांजरी एकमेकांना मिठी मारताना दाखवल्या आहेत.

व्हिडीओवरून आपण अंदाज लावू शकतो की, नेटकऱ्यांना हा सुपर क्युट व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहायला आवडतोय. Puffin_loves_binx नावाच्या मांजरींच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हे प्रोफाइल बायोमध्ये वाचले जाऊ शकते की, Binx हिला एका अपघातातून वाचवले गेले आहे. असे दिसून आले की, ती पफिनची सोलमेट आहे. त्यांच्या आगमनानंतर, दोघे कधीही एकमेकांपासून विभक्त झाले नाहीत.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by @puffin_loves_binx

व्हिडीओ शेअर करताना, पेज हाताळणाऱ्या प्रशासकाने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘चिक टू चिक… मला घरी यायला आणि या दोघांना मिठी मारताना पाहायला आवडते. हा सर्वोत्तम मूड बूस्टर आहे!’ व्हिडीओ सोबतच लोकांना कॅप्शन सुद्धा खूप आवडते आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

मांजरींचा हा व्हिडीओ पोस्ट केल्यापासून त्याला विविध प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडीओवर टिप्पणी करताना, एका वापरकर्त्याने लिहिले, ‘अरे !!! खूप सुंदर…. माझ्याकडेही अशा दोन मांजरी होत्या, ज्या खूप गोंडस आणि सुंदर होत्या. मला अजूनही त्यांची आठवण येते.’ दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, ‘असे सुंदर व्हिडीओ क्वचितच पाहिले जातात.’ तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, ‘हा व्हिडीओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद, तुम्ही माझा दिवस खूप गोड बनवला आहे’  याशिवाय, बहुतेक वापरकर्ते हार्ट इमोटिकॉन्स शेअर करून या व्हिडीओवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

हेही वाचा :

मुलाच्या अंगावर पडत होती भिंत, आईकडून छातीचा कोट, मुलगा वाचला, Viral Video पाहाच! 

Travel Hacks : उशीच्या मदतीने कॅरी केलं अतिरिक्त सामान, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले – ‘महिलेच्या जुगाडाला सलाम’

VIDEO | शिकारीला पाहून गेंड्याला वाचवण्यासाठी पोहोचली आई, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

VIDEO : पळून जाणाऱ्या जोडप्याला पकडलं, गळ्यात टायर टाकून नाचवलं, मध्यप्रदेशातील संतापजनक कृत्य

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI