Travel Hacks : उशीच्या मदतीने कॅरी केलं अतिरिक्त सामान, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले – ‘महिलेच्या जुगाडाला सलाम’

एक महिला उशीच्या कव्हरच्या मदतीनं अतिरिक्त सामान घेऊन जात आहे. लोक या व्हिडीओवर खूप प्रतिक्रिया देत आहेत. (Travel Hacks: Carried extra luggage with the help of a pillow)

Travel Hacks : उशीच्या मदतीने कॅरी केलं अतिरिक्त सामान, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले - 'महिलेच्या जुगाडाला सलाम'

मुंबई : आजच्या युगात प्रत्येकजण जुगाड करण्यात अव्वल आहे. जुगाडचे अनेक व्हिडीओ (Trending Videos) किंवा किस्से समोर येत असतात. अशा परिस्थितीत, आता एक बातमी (Amazing Travel Hacks) समोर येत आहे, ज्यात एक महिला उशीच्या कव्हरच्या मदतीनं अतिरिक्त सामान घेऊन जात आहे. लोक या व्हिडीओवर खूप प्रतिक्रिया देत आहेत. अगदी एका वापरकर्त्याने कमेंट केली आणि लिहिलं, ‘त्यांच्या जुगाडला सलाम’, रिपोर्ट्सनुसार, या महिलेने विमानात जाताना ही युक्ती केली आहे. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण.

जास्तीचे पैसे भरावे लागू नये म्हणून कधी तुम्ही तुमचं सामान कमी केलं आहे का? अनेक प्रवासी हे अतिरिक्त शुल्क भरावं लागू नये म्हणून जास्तीचे सामान घेऊन जात नाहीत, जेणेकरून त्यांना विमानतळावर काही गोष्ट सोडाव्या लागणार नाहीत, काही लोक कपड्यांचा थर घालून ही गोष्ट टाळतात, काही लोक आपलं सामान लपवण्यासाठी बनावट बेबी बम्पचा अवलंब करतात.  यावेळीही असंच काहीसं घडलं आहे. एका महिलेनं अतिरिक्त पैसे न देता विमानात अधिक सामान नेण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘तुम्हाला फक्त एका उशीची गरज आहे.’

अन्या लाकोव्लीएव्हानं सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

अन्या लाकोव्लीएव्हानं तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती आपले कपडे उशीच्या कव्हरमध्ये ठेवत आहे आणि हे उशीचे कव्हर काढून तिच्या प्रवासाला जाण्याची तयारी करताना दिसत आहे. त्यानंतर अन्या लाकोव्लीएव्हाने या उशीला तिच्या सुटकेसच्या वर ठेवलं आणि ती योग्यरित्या सेट केली. यशस्वीरित्या विमानात चढल्यानंतर अन्या यांनी उशीला मिठी मारली आणि त्यासोबत लिहिलं, ‘बेस्ट ट्रॅव्हल हॅक एव्हर.’

या क्लिपसह एक ऑडिओसुद्धा आहे, ज्यामध्ये असं ऐकायला येत आहे, की कोणालाही कळणार नाही आणि त्यांना कसं कळेल ‘काही लोक म्हणाले,’ विमानतळ सुरक्षा ते कपडे बाहेर काढू शकते ‘. त्याच वेळी, काही लोकांनी लिहिलं, ‘आता सर्वांना माहित आहे’, एका वापरकर्त्याने लिहिलं, ‘त्यांना शेवटी कसे कळेल? आणि स्वतः उत्तर देताना त्यानं ‘एक्स-रे’ असं म्हटलं, मग त्याच कमेंटवर दुसऱ्या वापरकर्त्यानं उत्तर दिलं, ‘एक्स-रेचा बॅगच्या फीसोबत काहीही संबंध नाही आणि ते सुरक्षेसाठी आहे.’ अन्याने त्याला असंही उत्तर दिलं की तिनं हा जुगाड 6 पेक्षा जास्त वेळा वापरला आहे आणि हे नेहमीच तिच्यासाठी काम करतं.

संबंधित बातम्या

दीड शहाणी नवरी, लग्नाचं सासूला निमंत्रण नाही, सासऱ्याला हृदय विकाराचा झटका, तरीही थाटमाट, एका लग्नाची विचित्र गोष्ट

VIDEO | शिकारीला पाहून गेंड्याला वाचवण्यासाठी पोहोचली आई, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

VIDEO : पळून जाणाऱ्या जोडप्याला पकडलं, गळ्यात टायर टाकून नाचवलं, मध्यप्रदेशातील संतापजनक कृत्य

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI