VIDEO : पळून जाणाऱ्या जोडप्याला पकडलं, गळ्यात टायर टाकून नाचवलं, मध्यप्रदेशातील संतापजनक कृत्य

मध्यप्रदेशात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दोन मुली आणि एक तरुण गळ्यात टायर टाकून नाचताना दिसत आहेत.

VIDEO : पळून जाणाऱ्या जोडप्याला पकडलं, गळ्यात टायर टाकून नाचवलं, मध्यप्रदेशातील संतापजनक कृत्य

भोपाळ : मध्यप्रदेशात माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दोन मुली आणि एक तरुण गळ्यात टायर टाकून नाचताना दिसत आहेत. याशिवाय एक व्यक्ती काठीने तरुणाला मारहाण करताना दिसतोय. खरंतर व्हिडीओ बघितल्यानंतर त्या व्हिडीओमधील नेमकं सत्य काय ते उलगडत नाही. पण ‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार या व्हायरल व्हिडीओच्या मागे एक कथा आहे. व्हिडीओच्या पाठीमागे काहीतरी घडलं आहे. त्यातूनच हा सर्व प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. या व्हिडीओच्या पाठीमागचं नेमकं प्रकरण काय? याचबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

नेमकं काय घडलंय?

संबंधित घटना ही धार जिल्ह्यातील गंधवानी पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. व्हिडीओतील 19 वर्षीय तरुणी ही तिच्या प्रियकरासोबत पळून जाण्याच्या प्रयत्नात होती. विशेष म्हणजे तिला पळून जाण्यासाठी तिची 14 वर्षीय लहान बहिणीने साथ दिली. पण प्रेमी युगुल अखेर पकडलं गेलं. मुलीच्या कुटुंबियांनी त्यांना जाब विचारला असता त्यांनी सर्वच घटनेची कबुली दिली. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या जोडप्यासह मुलीच्या लहान बहिणीला शिक्षा देण्याचं ठरवलं.

मुलीच्या कुटुंबियांकडून शिक्षा

मुलीच्या कुटुंबियांनी दोघी बहिणी आणि तरुणाच्या गळ्यात टायर टाकलं. त्यानंतर स्पिकर्स लावत त्यावर गाणं लावलं. त्या गाण्यावर मुलीच्या कुटुंबियांनी तिघांना नाचायला लावलं. यावेळी मुलीचे कुटुंबीय तरुणाला काठीने देखील मारहाण करतात. हा संबंध प्रकार गावातील काही नागरिकांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करत सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांवर कारवाईची मागणी होऊ लागली.

पोलिसांकडून चौघांना अटक

दरम्यान, या घटनेप्रकरणी पीडित 14 वर्षीय मुलीने पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी मुलीचे वडील, तिचा भाऊ आणि इतर नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना अटकही केली. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय मुलगी ज्या मुलासोबत पळून जाण्याच्या प्रयत्नात होती. त्याच मुलाच्या विरोधात मुलीने काही दिवसांपूर्वी बलात्काराची तक्रार केली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली होती, अशी देखील माहिती आता समोर आली आहे.

संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा :

कुमारवयात प्रेम होणं ही सर्वसामान्य बाब आहे. भारतीय समाजात आजही प्रेम विवाह ही संकल्पना रुजलेली नाही. पण अशावेळी कुटुंबियांनी संयमाने निर्णय घ्यायला हवा. रागाच्या भरात मुलगा आणि मुलीच्या मनावर वाईट परिणाम होईल, असं कृत्य करु नये. अन्यथा कुटुंबाला सुद्धा त्याचा फटका बसू शकतो. अनेक तरुण तर त्यातून आत्महत्या करण्याचादेखील टोकाचा निर्णय घेतात. त्यामुळे कुटुंबियांनी अशावेळी संयमाने विषय हाताळत मार्गदर्शन केलं पाहिजे. तसेच मुलगा किंवा मुलीची योग्य पात्रता बघून लग्नही लावून दिलं तरी हरकत नाही. पण सगळ्या गोष्टी संयमाने सोडवायला हव्यात. रागात विचित्र कृत्य करुन पदरी बदनामी किंवा विपरीत परिणामांशिवाय काहीच पडणार नाही. त्यामुळे काळजीपूर्वक परिस्थिती हाताळायला हवी.

हेही वाचा :

चालत्या गाडीत अल्पवयीन मुलीवर मेव्हण्याचा दोन वेळा बलात्कार, महिन्याभरानंतरही आरोपी मोकाट

भाजीमंडईत थरार घडवणारा टिप्या पोलिसांच्या तावडीतून पुन्हा निसटला, नाशिकमधल्या नातेवाईकांच्या घरावर पोलिसांचा छापा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI