video : पाठून येत होती ट्रेन, सेल्फी व्हिडीओ बनवत होता तरुण, नंतर ते जे घडले ते भयंकर

सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक तरुण रेल्वे रुळांवर उभा राहून समोरून येणाऱ्या ट्रेनचा व्हिडीओ शूट करीत होता.

video : पाठून येत होती ट्रेन, सेल्फी व्हिडीओ बनवत होता तरुण, नंतर ते जे घडले ते भयंकर
reels news
Image Credit source: socialmedia
| Updated on: Aug 04, 2023 | 9:37 PM

मुंबई | 31 जुलै 2023 : सोशल मिडीयावर हल्ली अनेक तरुण जीव धोक्यात घालून रिल्स शूट करताना दिसतात. काही वेळा असे व्हिडीओ शूट होतात. तर काही वेळा अशा स्टंटमुळे अनेकांना आपल्या जीवाला मुकावे लागते. व्हिडीओ आणि रिल्स बनवून समाजमाध्यमावर लाईक्स मिळविणे आणि प्रसिद्ध होण्याच्या नादात अनेक जणांचे जीव गेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे धोकादायक स्टंट आणि रिल्स करण्यापासून तरुणांनी दूर रहायला हवे.

सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक तरुण रेल्वे रुळांवर उभा राहून समोरून येणाऱ्या ट्रेनचा व्हिडीओ शूट करीत होता. तेव्हा पाठून येणाऱ्या ट्रेनपासून सुरक्षित अंतरावर तो उभा आहे का ? याचे कसलेही भान त्याला नव्हते. त्याला जराही कल्पना नव्हती की आपल्या सोबत काय घडणार आहे.

हा पाहा व्हिडीओ –

ट्रेन आली आणि अपघात घडला

ट्रेनच्या जवळून व्हिडीओ रिल्स काढताना आपण नेमके किती जवळ उभे आहोत याचे कोणतेही भान या तरुणाला नव्हते. व्हायरल व्हिडीओत दिसत आहे की हा तरुण रेल्वे रुळाच्या अगदी कडेला उभा आहे. त्यामुळे जशी ट्रेन वेगाने जवळ आली तशी त्याला तिने टक्कर मारली. ही टक्कर इतकी वेगवान होती की तरुणाचा मोबाईल हातातून उडाला. तो स्वत: ही जखमी झाला. नंतर त्याचे नेमके काय झाले ते कळले नाही. काही युजरने तो वाचल्याचे कमेंट दिले आहे.

आधीही घडले अपघात 

यापूर्वीही असे अपघात घडले आहे. ट्रेनला खेळणे समजू नये. यापूर्वी ट्रेनच्या शेजारी उभे राहून रिल्स बनविणे अनेकांना महाग पडले आहे. ट्रेन जवळ उभे राहून रिल्स बनविताना अपघात घडल्याचे अनेक व्हिडीओ समाजमाध्यमावर फिरत आहेत.