Viral Post: उडीबाबा ये कौन है?,”हॅलो सर माय नेम इज अल्पाका!”,पोलिसांनी केलं ट्विट,अल्पाका झाला फेमस

इतका क्युट प्राणी गाडीतून प्रवास करतोय पोलिसांना सुद्धा राहवलं नाही. एक स्कॉटिश पोलीस अधिकारी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची दैनंदिन तपासणी करत होता. रस्त्यात त्याला एक गाडी दिसली, नेहमीप्रमाणे पोलिसाने त्या गाडीची देखील तपासणी केली. त्याला ती गाडी तपासताना आश्चर्याचा धक्काच बसला.

Viral Post: उडीबाबा ये कौन है?,हॅलो सर माय नेम इज अल्पाका!,पोलिसांनी केलं ट्विट,अल्पाका झाला फेमस
उडीबाबा ये कौन है?
Image Credit source: Twitter
| Updated on: Jun 10, 2022 | 4:01 PM

आपण रस्त्याचे नियम (Rules) किती पाळतो हे आपल्यालाच माहित आहे. अनेकदा आपण गाडीतून अनेक चित्र विचित्र प्राणी (Animal) प्रवास करताना पाहतो. खरं तर भारतात जास्तीत जास्त कुत्रेच दिसतात गाडीत. पण हा बघा हा प्राणी. दुसऱ्या देशातला आहे फोटो पण क्युट आहे! इतका क्युट प्राणी गाडीतून प्रवास करतोय पोलिसांना सुद्धा राहवलं नाही. एक स्कॉटिश पोलीस अधिकारी (Scotish Police Officer) रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची दैनंदिन तपासणी करत होता. रस्त्यात त्याला एक गाडी दिसली, नेहमीप्रमाणे पोलिसाने त्या गाडीची देखील तपासणी केली. त्याला ती गाडी तपासताना आश्चर्याचा धक्काच बसला. ती जी गाडी तो तपासायला गेला, त्यात एक प्राणी बसलेला होता. तपासासाठी गाडी थांबवताच तो स्तब्ध झाला, कारण गाडीत एक अल्पाका बसला होता. अल्पाका काही ठिकाणीच आढळणारा प्राणी आहे. ही मेंढ्यांची एक प्रजाती आहे जी युरोपीय देशांमध्ये आढळते. पोलिस अधिकाऱ्याने नंतर अल्पाकाला पाहिल्यानंतर अनेक छायाचित्रे क्लिक केली.

पोलिसांना अचानक गाडीत असा प्राणी दिसला

हा फोटो फोर्थ व्हॅली पोलिसांनी ट्विटर अपलोड केला आणि अल्पाका प्रचंड फेमस झाला. ही पोस्ट ट्विटरवर शेअर करताना फोर्थ व्हॅली पोलिसांनी सांगितले की, पोलिसांनी तपासासाठी क्रेगफोर्थ, स्टर्लिंग येथे ब्लॅक इस्टेट कार अडवली. या पोस्टला कॅप्शन दिले होते की, “फोर्थ व्हॅलीत सकाळी रुटीन चेकअप केले जात होते. अनेक गाड्यांची तपासणी करण्यात आली, पण एका ट्रेनमध्ये आम्हाला एक अजब प्रवासी दिसला. कधी कधी ते बघायला मजा येते. अल्पाका सारखे काही अजब गजब लोक रस्ते सुरक्षेचे नियम पाळतात हे पाहून खूप आनंद झाला.”

हा फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या

शेअर केल्यापासून या पोस्टला शेकडो लाईक्स मिळाले आहेत. या फोटोंनी लोकांना आश्चर्याचा धक्का दिला. एका युझरने पोलिसांसोबतचा फोटो पाहिला तेव्हा तो म्हणाला, “अल्पाका म्हणाला असेल की सॉरी ऑफिसर, मी पुढच्या वेळी सूट-बूट घालून येईन.” एका युझरने लिहिलं, “पोलिसांनी चेकिंगसाठी गाडी थांबवली, पण आणखी काही दिसलं. अल्पाका लहान मुलासारखा गाडीतून बाहेर आला.” एका तिसऱ्या युजरने गमतीने म्हटले, “तुला भेटून आनंद झाला.” तर चौथ्याने सहज लिहिले, “हे किती क्यूट आहे.”