Viral Video : बकाबका खाल्लं, 10 हजारांचं बिल आल्यावर धूम पळाले.. ट्रॅफिकमुळे झाला घोळ अन्…

राजस्थानच्या माऊंट अबूजवळ काही पर्यटकांनी हॉटेलचे १० हजार बिल बुडवून पळ काढला, मात्र ट्रॅफिक जाममध्ये अडकल्याने हॉटेल मालकाने पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांच्यातील बाचाबाचीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, अखेर पर्यटकांना पैसे भरावे लागले. या घटनेने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.

Viral Video :  बकाबका खाल्लं, 10 हजारांचं बिल आल्यावर धूम पळाले.. ट्रॅफिकमुळे झाला घोळ अन्...
10 हजारांचं बिल थकवून पळाले, हॉटेल मालकाने घ़वली अद्दल
| Updated on: Oct 29, 2025 | 9:18 AM

सोशल मीडियावर वेगवेगळे फोट, व्हिडीओ व्हायरल होत असतात, त्यातले काही मजेशीर, काही धक्कादायक तर काही अतरंगी असतात. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने पसरला आहे, तो पाहून अनेक जण आश्चर्यचकित झालेत. राजस्थानच्या माऊंट अबूजवळ एका हॉटेलमध्ये पर्यटकांनी जेवण केलं, त्याचं बिल 10 हजार रुपये आलं. मात्र बिल भरायची वेळ आल्यावर त्यांनी शक्कल लढवत एकेक करून पळ काढला आणि बिल न भरताच गेले. मात्र हॉटेल मालकाने त्यांचा दूरपर्यंत पाठलाग केला. पण ट्रॅफिक जाममुळे ते पर्यटक अडकले आणिफसले. त्यानंतर हॉटेल मालकाने त्यांची चांगलीच कानउघडणी करत त्यांच्याकडून बिलाचे पैसे वसूल केले. यामध्ये त्यांच्या बाचाबाचीचा, व्हिडीओही रेकॉर्ड झाला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे.

नेमकं घडलं तरी काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील पाच पर्यटकांचा एक ग्रुप, यामध्ये एका महिलेचा समावेश होता, असे ते 5 जण राजस्थानातील सिरोही जवळील सियावा परिसरातील हॅपी डे हॉटेलमध्ये थांबले होते. तेथे त्यांनी विविध प्रकारचे स्वादिष्ट जेवण ऑर्डर केले आणि भरपेट जेवले. त्यांच्या जेवणाचं एकूण बिल झाले ते 10 हजार 900 रुपये. मात्र हे बिल भरण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा त्या पर्यटकांनी पैसे न देताच तिथून पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि पोबारा केला.

शक्कल लढवत काढला पळ

पैसे न भरताच घटनास्थळापासून पळून जाण्यासाठी, त्या ग्रुपने एक शक्कल लढवली. त्यांनी टॉयलेटमध्ये ब्रेक घेतला आणि एक एक करून, ते पाचही जण त्या रेस्टॉरंटमधून बाहेर पडले. नंतर ते सर्वजण एका कारमध्ये बसले आणि घटनास्थळावरून पळून गेले. मात्र ते लोक बिल न भरताच पळून गेल्याचे आणि त्यांनी आपली फसवणूक केल्याचे हॉटेल मालक आणि वेटरला काही वेळातच लक्षात आले. त्यानंतर रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांनी त्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.

हॉटेल मालकाकडून पाठलाग

त्या पर्यचकांना शोधून काढण्यासाठी त्या हॉटेलचे मालक आणि कर्मचाऱ्यांनी आधी सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा त्यांना गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवरील अंबाजीकडे जाणारी कार दिसली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि पर्यटकांच्या एका ग्रुपने त्यांना फसवल्याचा दावा केला. हॉटेल मालकाने काही कर्मचाऱ्यांसह पर्यटकांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी एक गाडी घेतली आणि पैसे ने भरताच पळून गेलेल्या त्या पर्यटकांचा पाठलाग सुरू केला.

 

ट्राफिक जाममध्ये अडकले आणि असे फसले पर्यटक

पैसे न भरताच पळू गेलेले पर्यटक खूप पुढे होते, ते तसेच निसटलेही असते. मात्र रस्त्यात असलेल्या ट्राफिक जाममुळे त्यांची कार अडकली आणि तेही फसले. त्याच वाहतूक कोंडीतून मार्ग काढत काढत हॉटेल मालक आणि कर्मचारी त्यांच्या गाडीच्या जवळ आले. त्यांनी त्या पर्यटकांचा गुजरात सीमेपर्यंत पाठलाग केला. अंबाजीजवळ वाहतूक कोंडी दरम्यान त्यांना पकडण्यात आले. हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्या पर्टकांना थांबवून जाब विचारला आणि त्यांच्या अटकेचे, संपूर्ण घटनेचे रेकॉर्डिंग केले.

शेवटी भरलं बिल

हॉटेल कर्मचाऱ्यांनी रेकॉर्ड केलेला एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाच पर्यटकांना अटक केली. त्यानंतर पर्यटकांनी एका मित्राला फोन करून बिल भरण्यासाठी ऑनलाइन पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगितले. व्हायरल व्हिडिओमधील गाडीवर गुजराती नंबर प्लेट असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर या घटनेवर लोक वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ चांगलाच पसरला आहे.