Viral Video | लोभी चिंपांझीचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले हा तर मानवांसाठी एक खास संदेश

सोशल मीडियावर प्राणी आणि पक्ष्यांशी संबंधित व्हिडीओ लोकांच्या खूप पसंतीस पडतात. या व्हिडीओजमध्ये अनेक वेगवेगळ्या आणि खास गोष्टी पाहायला मिळतात. कधी कधी प्राण्यांचे हे व्हिडीओ माणसांना जीवनाचे धडे शिकवणारे असतात, त्यातून तुम्हाला ते शिकायला मिळते जे जगातल्या कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक लोभी चिंपांझी दिसतो आहे.

Viral Video | लोभी चिंपांझीचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले हा तर मानवांसाठी एक खास संदेश
Greedy Chimpanzee Viral Video
| Edited By: | Updated on: Nov 14, 2021 | 8:36 AM

मुंबई : सोशल मीडियावर प्राणी आणि पक्ष्यांशी संबंधित व्हिडीओ लोकांच्या खूप पसंतीस पडतात. या व्हिडीओजमध्ये अनेक वेगवेगळ्या आणि खास गोष्टी पाहायला मिळतात. कधी कधी प्राण्यांचे हे व्हिडीओ माणसांना जीवनाचे धडे शिकवणारे असतात, त्यातून तुम्हाला ते शिकायला मिळते जे जगातल्या कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक लोभी चिंपांझी दिसतो आहे.

चिंपांझी हा त्याच्या अनोख्या कर्तृत्वामुळे अतिशय लोकप्रिय प्राणी मानला जातो. मग ते माणसासारखे चालणे असो, बसलेला असो किंवा माणसासारखा लोभ असो किंवा कंजूषपणा असो, हे सर्व गुण त्याच्यातही आहेत. आजकाल असाच काहीसा प्रकार समोर आला आहे ज्यामध्ये चिंपांझी माणसांसारखाच लोभ दाखवत आहे. तो एकाच वेळी इतकी फळे सोबत घेऊन जातोय, जणू काही त्याला पुन्हा कधी फळे घेऊन जाण्याची संधीच मिळणार नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिंपांझी त्याच्या दोन्ही पायांवर चालताना दिसत आहे. असे चालणे ही त्याच्यासाठी काही खास गोष्ट नसली तरी या व्हिडीओमध्ये विशेष म्हणजे यात तो दोन्ही हातांसह पायाच्या बोटांमध्ये आणि तोंडात फळं घेऊन धावताना दिसत आहे.

हा व्हिडीओ पाहा –

हा व्हिडीओ मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर @buitengebieden_ नावाच्या अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत 17 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ज्यासोबत त्याने कॅप्शन लिहिले, ‘जेव्हा तुम्हाला एका बॅगसाठी 10 सेंट द्यायचे नसतात.’ यासोबतच यूजर्स या व्हिडिओवर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.

व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘प्लास्टिकच्या पिशव्या आपल्या पृथ्वीसाठी चांगल्या नाहीत, हे चिंपांझींनाही माहीत आहे.’ दुसऱ्या यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘हे खूप हुशार आहेत. जेव्हा मी माझ्या पुढच्या खरेदीला जाईन तेव्हा मी हे नक्की करेन.’ दुसर्‍या युजरने लिहिले की, ‘हा व्हिडिओ आम्हा मानवांसाठी एक खास संदेश देत आहे.’ याशिवाय इतर अनेक वापरकर्त्यांनी यावर कमेंट केल्या आहेत.

संबंधित बातम्या :

Video : लग्न समारंभात नवरीऐवजी नवऱ्याच्याच डोळ्यात अश्रू! व्हिडीओ व्हायरल

Video | वाघाने गाईला चपळाईने पकडलं, जंगलात फरफटत नेण्याचा प्रयत्न, शिकारीचा थरार कॅमेऱ्यात कैद