Viral Video : काहीही घडू शकतं.. त्याने चक्क ट्रेनमध्येच लग्न लावलं, प्रवासी बनले वऱ्हाडी, म्हणाले…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये प्रियकराने आपल्या मैत्रिणीसोबत चालत्या ट्रेनमध्ये लग्न केले. हे बघून तिथे उपस्थित लोक थक्क झाले.

Viral Video : काहीही घडू शकतं.. त्याने चक्क ट्रेनमध्येच लग्न लावलं, प्रवासी बनले वऱ्हाडी, म्हणाले...
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 29, 2023 | 1:17 PM

Marriage in Train : भारतात नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात लग्नसराईची लाट आलेली असते. थंडीच्या या बहारदार ऋतूमध्ये अनेक लोक मोठ्या थाटामाटात लग्न करतात. तुमच्या ओळखीतही कोणाचं ना कोणाचं लग्न होत असेल ना ! लग्नाचे हे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावरही शेअर केले जातात. सध्या लग्नाचा असाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आणि त्यावर तूफान कमेंट्सही येत आहेत. इंटरनेटवर व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेटिझन्सना चांगलाच आवडला आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की लग्नाच्या व्हिडीओमध्ये एवढं काय खास असणार ? सगळी जोडपी लग्न करतात, मग या लग्नाची एवढी चर्चा का ? असंही तुम्हाला वाटत असेल. पण हे लग्न काही साधंसुधं नव्हे. नेहमीप्रमाणे लग्नाच्या हॉलमध्ये किंवा मंदिरात झालेलं लग्न नाही तर हा विवाह चक्क चालत्या ट्रेनमध्ये झाला आहे. वाचून तुम्हीही आश्चर्यचकित झालात ना. पण हे खरं आहे. एका जोडप्याने चक्क चालत्या ट्रेनमध्ये एकमेकांशी लग्न केलं. आत्तापर्यंत तुम्ही हे फक्त चित्रपटातच पाहिलं असेल पण हे प्रत्यक्षात घडलं आहे.

ट्रेनमध्येच केलं लग्न, मंगळसूत्रही घातलं

तुम्ही आत्तापर्यंत अनेक लग्नांना हजेरी लावली असेल, पण अशा पद्धतीने लग्न करताना पहिल्यांदाच पाहिलं असेल. या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून एक जोडपं चालत्या ट्रेनमध्ये लग्न करताना, त्या व्हिडीओत दिसत आहे. तरूणाने सर्वांच्या समोर त्या तरूणीच्या डोक्यावर कुंकू लावलं आणि गळ्यात मंगळसूत्रही घातलं. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना वरमाला घातल्या. हे सगळं होताना ट्रेनमध्ये चिक्कार गर्दी होती. ट्रेनमधला हा अनोखा विवाह सोहळा पाहून काही लोकं चकित तर काहीजण खूप खुशही झाले.

लोकांच्या प्रतिक्रिया काय ?

वायूवेगान व्हायरल होत असलेला व्हिडिओ max_sudama_1999 नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ‘चालत्या ट्रेनमध्ये लग्न, वाह व्वा काय गोष्ट आहे’, अशी कॅप्शनही त्याखाली लिहीली आहे. ही क्लिप पाहून विविध युजर्सनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. हे सगळं करण्यात आमच्या भारतातील जनता आघाडीवर आहे, असे एक युजर म्हणाला. तर ‘याला लव्ह मॅरेज नाही तर ट्रेन मॅरेज म्हटले जाईल’ अशी अनोखी कमेंट दुसऱ्या युजरने केली. हा भाऊ तर खूप वेगवान आहे, असे आणखी एकाने लिहीले आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 63 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला असून लाखोंनी लाईकही केलाय.

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.