Video : बापाने पहिल्यांदाच नवजात मुलाला मांडीवर घेतलं, आणि त्याला अश्रू अनावर झाले, भावनिक करणारा क्षण

आपल्या गोंडस चिमुरड्याला पाहून हा व्यक्ती आपले अश्रू आवरू शकला नाही, त्याने आपल्या मुलाला गच्च मिठी मारली, आणि कुणीतरी हा सुंदर क्षण त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला

Video : बापाने पहिल्यांदाच नवजात मुलाला मांडीवर घेतलं, आणि त्याला अश्रू अनावर झाले, भावनिक करणारा क्षण
आपल्या गोंडस चिमुरड्याला पाहून हा व्यक्ती आपले अश्रू आवरू शकला नाही
| Edited By: | Updated on: Sep 21, 2021 | 5:47 PM

इंटरनेटचं जग हे अनेक कॉमेडी व्हिडिओंनी भरलेले आहे. पण कधी कधी असे काही व्हिडिओ येतात, जे तुमच्या हृदयात खोलवर रुजतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक व्यक्ती आपल्या मुलाला मांडीवर घेताच भावूक होते. पहिल्यांदा बाप बनल्याचं सुख काय असतं हे या व्यक्तीला जाणवत आहे. त्यामुळे त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आहेत. ( Viral video: A father takes a newborn baby on his lap, he sheds tears of joy )

डॉक्टर, या मुलाला या व्यक्तीच्या मांडीवर ठेवताना म्हणतात, तुमच्या मुलाला मांडवर घ्या. त्यानंतर ही व्यक्ती आपल्या मुलाला मांडीवर घेते आणि भावूक होते. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू येऊ लागतात. आपल्या गोंडस चिमुरड्याला पाहून हा व्यक्ती आपले अश्रू आवरू शकला नाही, त्याने आपल्या मुलाला गच्च मिठी मारली कुणीतरी हा सुंदर क्षण त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला.

या व्हायरल व्हिडिओने सोशल मीडिया नेटकऱ्यांना भावूक केलं, यावर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिलाय, ज्यात एकाने सांगितलं, की हा त्याच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण होता. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्येही पहिल्यांदा बाप बनल्यानंतर काय भावना असते हे शब्दात मांडता येणार नाही असं लिहण्यात आलं आहे.

पाहा व्हिडीओ-


हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच लोकांनी त्यावर कमेंट करायला सुरुवात केली. एका नेटकऱ्याने सांगितले की, खरोखर ही भावना अनुभवणे हा जगातील सर्वात आनंदाचा क्षण आहे. त्याचवेळी, दुसऱ्याने कमेंट केली की, जगातील प्रत्येक मौल्यवान वस्तू या सुंदर क्षणापुढे फिक्या पडतील. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडताना दिसतो आहे.

हेही वाचा:

Viral Video: 150 किलोची पल्सर डोक्यावर घेऊन हे महाशय थेट बसच्या टपावर चढले, असा देसी जुगाड तुम्ही पाहिला नसेल!

Space Station Video : स्पेस स्टेशनमध्ये अंतराळवीराच्या कसरती, व्हिडीओ पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का