Video: वजनाच्या दुप्पट शिकार तोंडात धरुन उभ्या झाडावर चढला, बघा बिबट्यात किती अफाट ताकद असते!

| Updated on: Nov 02, 2021 | 12:13 PM

स्वत:च्या वजनाहूनही जास्त असणाऱ्या काळविटाची शिकार केल्यानंतर हा बिबट्या त्याला घेऊन थेट सरळ उभ्या झाडावर चढताना दिसतो. यावरुन तुम्ही अंदाज लावू शकता की बिबट्याचे नखं किती मजबूत असतात. त्याच्यामध्ये किती ताकद असते.

Video: वजनाच्या दुप्पट शिकार तोंडात धरुन उभ्या झाडावर चढला, बघा बिबट्यात किती अफाट ताकद असते!
भल्यामोठ्या काळविटाची शिकार करुन त्याला बिबट्या थेट झाडावर घेऊन गेला
Follow us on

बिबट्या जंगलातील भयानक प्राण्यांपैकी एक आहे. बिबट्याइतका चपळ आणि खतरनाक प्राणी जंगलात शोधून सापडत नाही. अफाट ताकद, चपळाई आणि झाडावरही सहज चढण्याचं कौशल्य त्याला एक उत्तम शिकारी बनवतं. बिबट्याचे हेच गुण दाखवणारा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. स्वत:च्या वजनाहूनही जास्त असणाऱ्या काळविटाची शिकार केल्यानंतर हा बिबट्या त्याला घेऊन थेट सरळ उभ्या झाडावर चढताना दिसतो. यावरुन तुम्ही अंदाज लावू शकता की बिबट्याचे नखं किती मजबूत असतात. त्याच्यामध्ये किती ताकद असते. ( viral video leopard cub drops whole impala on moms head leapard kill impala and go to the top of tree wild animal video)

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही एका झाडाशेजारी उभा असलेला बिबट्या पाहू शकता, जो मोठ्या काळविटाची शिकार करुन त्याला घेऊन जात आहे. तो या काळविटाला जबड्यात धरुन अगदी सहज झाडावर चढतो. या काळविटाला तो थेट उंच फांदीवर घेऊन जातो. फांदीवर या मृत काळविटाला ठेवतो. पण तितक्यात वजनाने काळविट खाली पडतं, जिथं या बिबट्याची आई उभी असते. ती याने घाबरुन उडी मारते.

सिंह, वाघ, हायना वा जंगली कुत्र्यांपासून आपण केलेली शिकार लपवण्यासाठी बिबट्या ते झाडावर घेऊन जात असतो. कारण, यापैकी कुठल्याही प्राण्याला झाडावर चढता येत नाही, किंबहुना त्यांच्याकडे ते कौशल्यच नाही. पण, निसर्गाने बिबट्याला ही अद्भूत क्षमता दिली आहे. त्यामुळे शिकारीच्या बाबतीत बिबट्या नेहमी अव्वल ठरतो.

व्हिडीओ पाहा:

बिबट्याचा हा व्हिडीओ खूप जुना आहे, मात्र आता पुन्हा एकदा हा व्हायरल होत आहे. हा 1 मिनिटांचा व्हिडिओ YouTube वर Latest Sightings नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. बिबट्याचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. एक दिवसापूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत ३५ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. काहींना हा व्हिडिओ खूपच मजेदार वाटला, तर काहींना हॅलोवीनची आठवण झाली. त्याच वेळी, अनेक वापरकर्त्यांनी याला हरणांनी घेतलेला बदला असे वर्णन केले आहे.

त्याचबरोबर हजाराहून अधिक लोकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. एका यूजरवर कमेंट करताना लिहिले, ‘अप्रतिम फुटेज. पण हरणाचा मृतदेह ज्या पद्धतीने बिबट्यावर पडतो, तेही मला खूप मजेदार वाटले.

हेही पाहा:

Video: हायना-सिंहाची लढाई, पाहा कोण विजयी, कोण पराभूत, नेटकऱ्यांना धक्का देणारा व्हिडीओ

Video: दिवाळीआधी माकडांचा मेकअप, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, आपले पूर्वज आपल्याही पुढे आहेत!