AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: दिवाळीआधी माकडांचा मेकअप, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, आपले पूर्वज आपल्याही पुढे आहेत!

व्हिडिओमध्ये दोन माकडिनी एकमेकींच्या शेजारी बसलेल्या दिसत आहेत. माकडीनींपैकी एक माकडीन आपल्या मैत्रिणीचे डोळे अगदी प्रेमाने साफ करत आहे.

Video: दिवाळीआधी माकडांचा मेकअप, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, आपले पूर्वज आपल्याही पुढे आहेत!
एक माकड दुसऱ्याचा मेकअप करताना
| Edited By: | Updated on: Nov 01, 2021 | 1:17 PM
Share

माणूस आधी माकड होता, नंतर सभ्यतेच्या विकासाबरोबरच त्याचा विकासही झाला आणि तो माकडातून माणूस झाला. म्हणूनच तर माकडांना माणसाचं पूर्वज म्हटलं जातं. अशा परिस्थितीत माकडंही कधी कधी माणसांप्रमाणे वागताना दिसतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हालाही हे समजेल की माकड आणि माणसामध्ये किती समानता आहे. (Viral video monkey Makeup who make eyebrows of their partner people will love this after watching animal video funny video)

व्हिडिओमध्ये दोन माकडिनी एकमेकींच्या शेजारी बसलेल्या दिसत आहेत. माकडीनींपैकी एक माकडीन आपल्या मैत्रिणीचे डोळे अगदी प्रेमाने साफ करत आहे. अगदी पान घेऊन, त्याच्या देढाचा वापर मेकअप ब्रशसारखा ती करत आहे. जंगलात शूट केलेल्या दोन माकडांचा हा व्हिडीओ लोकांना चांगलाच आवडला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माकडीन दुसऱ्या माकडीनीचे डोळे साफ करत आहे. आधी ती आपल्या मैत्रिणीचे डोळे एका पानाने साफ करताना दिसते. मग पुन्हा दुसरं पान घेते आणि पुन्हा त्याच्या देठाचा वापर ब्रशसारखा करत ती डोळे साफ करते. विशेष म्हणजे जिची साफसफाई सुरु आहे, तीही एखाद्या ग्राहकाप्रमाणे हे सगळं करुन घेत आहे.

हा व्हिडीओ पाहा

हा व्हिडिओ सुशांत नंदा यांनी त्याच्या ट्विटर अकाउंटवरून सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत त्यांनी कॅप्शनही लिहिले आहे की, ‘दिवाळीसाठी आयब्रो करणं सुरु आहे’, बातमी लिहिपर्यंत या व्हिडिओला 38 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच अनेक लोक कमेंट करत आहेत.

यूजर्स या व्हिडिओवर मजेदार आणि वेगळ्या कमेंट करत आहेत. एका युजरने म्हटलं की, ‘तिने ब्युटीशियनलाही मागं सोडलं आहे, हे एक उदाहरण आहे की ते आमच्यापेक्षा जास्त हुशार आहे आणि आयुर्वेदिक पद्धतीने स्वच्छता करतात. त्याच वेळी, दुसऱ्याने लिहले की, ‘माकडांना पाहून तुम्हाला कधीही कंटाळा येणार नाही.’ एका युजरने लिहिले, ‘हे सलूनच्या दृश्यासारखे वाटतं. जिथे एक माकड दुसऱ्याला म्हणतं की, मी तुझी स्टायलिश कटिंग करुन देतो.

हेही पाहा:

Video: हायना-सिंहाची लढाई, पाहा कोण विजयी, कोण पराभूत, नेटकऱ्यांना धक्का देणारा व्हिडीओ

Video: ‘घोडे शर्यतीत धावतात, एकमेकांवर नाही’, हे वाक्य खोटं करुन दाखवणारा भन्नाट व्हिडीओ, पाहा 2 घोड्यांची लढाई!

 

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.