AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सात फेरे घेतल्यानंतर वधू-वराचा एक मजेदार गेम; पंडितजींनी काय चॅलेंज दिलं? पाहा Video

लग्नाचे व्हिडिओ (Wedding Videos) इंटरनेटवर कायमच हिट होत असतात. वधू आणि वरांच्या अनेक मजेदार आणि हटके क्लिप दररोज व्हायरल (Video Viral) होत आहेत. असाच एक व्हिडिओ समोर आलाय.

सात फेरे घेतल्यानंतर वधू-वराचा एक मजेदार गेम; पंडितजींनी काय चॅलेंज दिलं? पाहा Video
Viral Wedding
| Updated on: Jan 06, 2022 | 1:29 PM
Share

लग्नाचे व्हिडिओ (Wedding Videos) इंटरनेटवर कायमच हिट होत असतात. वधू आणि वरांच्या अनेक मजेदार आणि हटके क्लिप दररोज व्हायरल (Video Viral) होत आहेत. आपल्यावला माहिती आहेच, की आपले भारतीय विवाहसोहळे हे अनेक विधी आणि परंपरांनी भरलेले असतात. असाच एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये वधू आणि वर त्यांच्या लग्नाच्या विधीदरम्यान त्यांच्या पुजाऱ्याच्या सांगण्यावरून एक मजेदार लग्नाचा खेळ खेळताना दिसत आहेत.

कोण जिंकतं? व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो, की वधू आणि वर लग्नाच्या मंडपात बसले आहेत. लग्नाशी संबंधित सर्व विधी पूर्ण झाले आहेत. इतक्यात पंडितजी दोघांना एक खेळ खेळायला सांगतात. तो खेळ समजावून सांगताना ते म्हणतात, की जो कोणी आधी खुर्चीवर बसेल, घर चालवण्याची चावी त्याच्या हातात असेल. पंडितजींनी हात खाली करताच दोघेही पटकन खुर्चीवर बसले. दोघांनीही आधी खुर्चीवर बसल्याचा दावा केला, पण व्हिडिओ नीट पाहिल्यानंतर नववधूचा विजय झाल्याचं स्पष्ट होतं.

होतोय तुफान शेअर हा व्हिडिओ कधी आणि कुठे झालेल्या लग्नाचा आहे, याबद्दल तर माहिती नाही. मात्र अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तो शेअर केला जातोय. इन्स्टाग्रामवर witty_wedding नावाच्या पेजवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. ज्यामध्ये लिहिलंय, की घर कोण चालवणार आहे यावर पैज आहे. विश्वास बसत नाही की एक आठवडा झाला आहे.

लाइक्स आणि कमेंट्स लग्नात अशा गेम्सची कल्पना लोकांना आवडल्यानं व्हिडिओला 8000हून अधिक वेळा लाइक करण्यात आलंय. “हाहा खूप मजेदार,” एका यूझरनं लिहिलंय. तर इतरांनी हार्ट आणि फायर इमोजीसह कमेंट्स दिल्यात.

Maut Ka Kuan : स्टंटमॅनसारखं ‘मौत का कुआं’मध्ये धावतायत हे लोक, आयएएस अधिकाऱ्यानं शेअर केला Video

Viral : रस्त्यावरच्या विक्रेत्यानं मॅगीमध्ये पाण्याऐवजी हे काय मिसळलं? Video पाहून यूझर्स म्हणतायत…

Viral Video : जिराफासोबत पंगा पडला भारी, महिलेला शिकवला चांगलाच धडा

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.