Video: दारावर बेल नाही, तर फणा काढून बसलेला नाग, लोक म्हणाले, या घरात जाण्याची रिस्क चोरही घेणार नाही!

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दरवाजाच्या बाहेर एक साप फणा काढून बसला आहे. व्हिडिओ बनवणारा त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, त्यानंतर तो हल्ला करतो.

Video: दारावर बेल नाही, तर फणा काढून बसलेला नाग, लोक म्हणाले, या घरात जाण्याची रिस्क चोरही घेणार नाही!
घराच्या दरवाज्यावर फणा काढून बसलेला कोब्रा
| Edited By: | Updated on: Oct 26, 2021 | 11:31 AM

सोशल मीडियाच्या जगात कधी, काय बघायला, ऐकायला मिळेल, काहीच सांगता येत नाही? इथे कधी फनी व्हिडिओ, तर कधी चकित करणारे व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेचा विषय राहतात. आता एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक कोब्रा साप दरवाजाच्या मध्यभागी फणा काढून बसलेला दिसतो. (Viral video of cobra sitting on the door watch people were shocked to see it)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दरवाजाच्या बाहेर एक साप फणा काढून बसला आहे. व्हिडिओ बनवणारा त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, त्यानंतर तो हल्ला करतो. क्लिप पाहिल्यावर हा साप मोठा आणि धोकादायक असल्याचे दिसून येत आहे.

व्हिडीओ पाहा

24 सेकंदांचा हा धक्कादायक व्हिडिओ @DoctorAjayita नावाच्या युजरने शेअर केला आहे. ज्याला बातमी लिहिपर्यंत 15 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 1000 लाईक्स मिळाले आहेत. यासोबतच लोक या व्हिडिओवर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.

हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्स हैराण झाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका युजरने लिहिले, ‘स्वागताचा सर्जनशील मार्ग.’ तर दुसर्‍याने लिहिले, ‘या घरात जाण्याची रिस्क कुणीही घेणार नाही.’ अजून एकाने लिहिले, ‘या घराची बेल लवकर वाजवणार नाही.’

हेही पाहा:

Viral: हॉटेलबाहेर भांडी धुणारं माकड, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, याला तर एम्पॉली ऑफ द मंथचा अवॉर्ड दिला पाहिजे!

Video: आकाश भेदणाऱ्या गरुडाला कधी पोहताना पाहिलंय? गरुडाची आणखी एक कला दाखवणारा व्हिडीओ