Viral: हॉटेलबाहेर भांडी धुणारं माकड, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, याला तर एम्पॉली ऑफ द मंथचा अवॉर्ड दिला पाहिजे!

चहा-नाश्त्याच्या दुकानात ताट आणि भांडी धुणारे असे लोक काम करताना पाहिले असतील, पण तुम्ही कधी माकडाला हे करताना पाहिले आहे का? ते माकड माणसांप्रमाणेच काम करतं, भांडी धुतं

Viral: हॉटेलबाहेर भांडी धुणारं माकड, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, याला तर एम्पॉली ऑफ द मंथचा अवॉर्ड दिला पाहिजे!
हॉटेलबाहेर भांडी धुणारं माकड

अनेकदा तुम्ही हॉटेल किंवा चहा-नाश्त्याच्या दुकानात ताट आणि भांडी धुणारे असे लोक काम करताना पाहिले असतील, पण तुम्ही कधी माकडाला हे करताना पाहिले आहे का? ते माकड माणसांप्रमाणेच काम करतं, भांडी धुतं, याच माकडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (monkey washes plates at hotel video goes viral on social media)

आपला हात जगन्नाथ ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल, म्हणजे काहीतरी कमावण्यासाठी आपल्याला मेहनत करावीच लागते, त्यामुळे ज्या हाताने आपण काम करतो तोच हाच देव आहे. आता हीच म्हण माकडावर लागू पडत असेल तर काय म्हणाल? कारण हे माकड कुणीही काहीही न सांगता काम करताना दिसत आहे. त्यामुळेच लोक या माकडाचे चाहते झाले आहेत. .

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक माकड भांडी धुताना दिसत आहे. त्याचे हे कृत्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. माकडाची भांडी धुण्याची शैली अतिशय अनोखी आहे. भांडी धुतल्यानंतर त्यात काही घाण राहिली आहे का, याचीही तो तपासणी करत आहे.

आधी व्हिडीओ पाहा:

माकडाच्या मेहनतीचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. यावर अनेकांनी कमेंट केल्या. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, दोन वेळच्या भाकरीसाठी माणसांनीही या माकडासारखे काम करावे. दुसरीकडे, दुसर्‍या यूजरने लिहिले की, ‘हा तर एम्पॉली ऑफ द मंथ अवॉर्ड आहे. याशिवाय अनेकांनी इमोजीज द्वारे आपल्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा:

Video: धरणाच्या सरळ भिंतीवर चढणाऱ्या, धावणाऱ्या शेळ्या, डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असा व्हिडीओ

Video: मालकाच्या आदेशावर हवं ते करणारा कोंबडा, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, असे कोंबडे घरोघरी हवे!

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI