AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: पाकिस्तानी गायिका नताशा बेगच्या आवाजात माणिके मागे हितेचं नवं व्हर्जन, नेटकरी म्हणाले, हे भन्नाट आहे!

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी गायिका नताशा बेग (Natasha Baig) गिटार वाजवताना आणि 'माणिक मागे हिते' गाताना दिसत आहे. गायिका नताशाने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला

Video: पाकिस्तानी गायिका नताशा बेगच्या आवाजात माणिके मागे हितेचं नवं व्हर्जन, नेटकरी म्हणाले, हे भन्नाट आहे!
पाकिस्तानी गायिका नताशा बेग
| Edited By: | Updated on: Oct 26, 2021 | 2:37 PM
Share

‘माणिक मागे हिते’ (Manike Mage Hithe) या श्रीलंकन ​​हिट गाण्याची क्रेझ थांबण्याचं नाव घेत नाही आहे. गायक योहानी डी सिल्वाचा (Yohani Diloka de Silva) जादुई आवाज इतका गाजला आहे की, आता प्रत्येकजण त्याची गाणी गाऊन लोकांची मनं जिंकत आहे. आता या यादीत पाकिस्तानी गायिका नताशा बेगच्या (Pakistani singer Natasha Baig) नावाचाही समावेश झाला आहे. त्याचा एक व्हिडिओ तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे, जो लोकांना खूप आवडला आहे. (Viral Video Pakistani Singer Natasha Baig sings Yohanis Manike Mage Hithe)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी गायिका नताशा बेग (Natasha Baig) गिटार वाजवताना आणि ‘माणिक मागे हिते’ गाताना दिसत आहे. गायिका नताशाने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, मीही हे गाणे ट्राय केलं आहे. आशा आहे की मी गाण्याचे बोल चुकीचे गायले नाहीत. हे गाणे किती सुंदर आहे हे सांगता येणार नाही. हे खरोखरच एक जबरदस्त गाणं आहे.’ नताशाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 7 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याच वेळी, व्हिडिओ पाहिल्यानंतर, लोक त्यावर सतत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

पाहा व्हिडीओ:

इंटरनेटचे जगच असे आहे की, इथे कधी आणि कोण खळबळ माजवतो हे कोणालाच कळत नाही. सोशल मीडियाच्या या युगात टॅलेंट कधीच लपून राहू शकत नाही. काही महिन्यांपूर्वी श्रीलंकन ​​गायिका योहानीसोबतही असेच घडले होते, जेव्हा तिने गायलेले ‘माणिक मागे हिते’ हे गाणे अचानक सोशल मीडियावर ट्रेंड करू लागले होते. जरी योहानीचे हे गाणे हिंदी भाषेत नाही. मात्र यानंतरही योहानीच्या जादुई आवाजावर लोकांना विश्वास बसला आहे. या गाण्यामुळे योहानीलाही बॉलिवूडमध्ये गाण्याची संधी मिळाली आहे.

योहानी ही श्रीलंकेतील कोलंबोची रहिवासी आहे. ती एक गायक, गीतकार, रॅपर आणि कंम्पोजर आहे. योहानी ही टिकटॉकवरील प्रसिद्ध सेलिब्रिटी देखील आहे. तिला श्रीलंकेची ‘रॅप प्रिन्सेस’ म्हणूनही ओळखले जाते. ती आपल्या देशात आधीच लोकप्रिय आहे, पण यूट्यूबवर खळबळ माजवल्यानंतर आता संपूर्ण जग तिला ओळखू लागले आहे.

हेही पाहा:

Video: दिल्लीतल्या मटका मॅनचे उद्योगपती आनंद महिंद्राकडून आभार, व्हिडीओ पोस्ट करुन कार्याचा गौरव

Viral: हॉटेलबाहेर भांडी धुणारं माकड, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, याला तर एम्पॉली ऑफ द मंथचा अवॉर्ड दिला पाहिजे!

 

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.