Viral Video : आई-बाबा पोझ देत होते मुले फोटो काढत होती, तेवढ्यात जे घडले ते भयानक

ही महिला तिच्या पतीबरोबर फोटोसाठी पोझ देत असताना पाठीमागून लाटा थडकताना दिसत आहेत. तेवढ्यात एक...

Viral Video : आई-बाबा पोझ देत होते मुले फोटो काढत होती, तेवढ्यात जे घडले ते भयानक
sea couple video
Image Credit source: socialmedia
| Updated on: Jul 20, 2023 | 2:04 PM

मुंबई : एका दाम्पत्याचा हृदयाचा थरकाप उडविणारा व्हिडीओ सोशल साईटवर ( Viral Video ) व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक दाम्पत्य मुंबईतील वांद्रे बॅण्ड स्टॅंड ( Band Stand Video ) येथे आपल्या मुलाबालांसह फिरायला आले असताना त्या मुलांची आई समुद्राच्या लाटेने अक्षरश: वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या व्हिडीओनंतर समुद्र खवळलेला असताना समुद्र किनाऱ्यावर किती काळजी घ्यायला हवी हे पुन्हा अधोरेखीत झाले आहे.

मुंबईच्या वांद्रे येथील समुद्राच्या किनाऱ्यावर फिरायला नेहमीच गर्दी होत असते. परंतू येथे अनेक अपघातही घडले आहेत. रबाळे येथून बॅण्ड स्टॅंडला फिरायला आलेल्या एका दाम्पत्याच्या अंगावर काटा येईल असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक 32 वर्षीय महिला तिच्या पतीबरोबर खडकांवर समुद्राच्या आत बसलेली दिसत आहे. आणि कोणीतही त्यांचा व्हिडीओ काढताना दिसत आहे. कदाचित त्यांची मुलेच व्हिडीओ काढत असावीत असे हा व्हिडीओ पाहताना वाटते.

हाच तो भयानक व्हिडीओ…

वांद्रे येथील समुद्राच्या किनाऱ्यावर एक ज्योती सोनार नावाची महिला आपल्या पती आणि तीन मुलांसह फिरायला आली असतानाचा हा व्हिडीओ आहे. ही महिला तिच्या पतीबरोबर फोटोसाठी पोझ देत असताना पाठीमागून लाटा थडकताना दिसत आहेत. तेवढ्यात एक मोठी लाट या महिलेला आपल्या कवेत घेऊन जाताना दिसत आहे, त्यावेळी तिची मुले तिला मम्मी म्हणून हाक मारताना व्हिडीओत दिसत आहे.

पतीला तर काय होतेय हे कळण्याआधीच त्याची पत्नी समुद्राच्या लाटेबरोबर नाहीशी झाल्याचे हताशपणे पाहावे लागल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. इतर पर्यटकांनी पोलिसांना तातडीने कॉल केला, त्यानंतर फायर ब्रिगेटचे अधिकारी आणि बचाव पथक दाखल झाले. शनिवारी घडलेल्या या घटनेनंतर रविवारी रात्री या महिलेचा मृतदेह कोस्ट गार्डला सापडला असे टाईम्सच्या बातमीत म्हटले आहे. हे दाम्पत्य लोखंडी कुंपण ओलांडून फोटो काढण्यासाठी आत समुद्रात गेल्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मराठे यांनी सांगितले.