AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रयान-3 च्या कक्षेत बदल केला, आता अंडाकार फेरी मारणार, पृथ्वीपासून 42 हजार किमी दूरुन चक्कर

पृथ्वीपासून चंद्र 3 लाख 8 4 हजार 400 किमीवर अंतरावर आहे. आता पृथ्वीच्या कक्षेत लंबवर्तुळाकार घिरट्या मारणारे चंद्रयान-3 आता 36,500 किमीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत पोहचले आहे.

चंद्रयान-3 च्या कक्षेत बदल केला, आता अंडाकार फेरी मारणार, पृथ्वीपासून 42 हजार किमी दूरुन चक्कर
payload seprationImage Credit source: socialmedia
| Updated on: Jul 20, 2023 | 2:03 PM
Share

नवी दिल्ली : चंद्रयान-3 चा प्रवास चंद्राच्या भेटीसाठी सुरु झाला असला तरी अजून खूपच अवकाश आहे. चंद्रयान-3 ने ( chandrayaan 3 ) आपली पहिली कक्षा यशस्वीपणे बदलली आहे. आता चंद्रयान पृ्थ्वीभोवती 42 हजार किमी अंतरावरुन अंडाकार प्रदक्षिणा मारणार आहे. चंद्रयान-3 च्या पृथ्वीच्या भोवतीच्या पाच लंबवर्तुळाकार फेऱ्या झाल्या की ते चंद्राच्या कक्षेत शिरणार आहे. चला पाहूया चंद्रभेटीचा हा प्रवास कसा असेल..

चंद्रयान-3 ला काल शुक्रवारी दुपारी आंध्रातील सतिश धवन केंद्रातून बरोबर 2.35 वाजता महाकाय रॉकेटद्वारे चंद्राच्या दिशेने रवाना झाले आहे. लॉंचिंगनंतर चंद्रयान विषुववृत्तावर 179 किमीवरील कक्षेतून आता 36,500 किमीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत पोहचले आहे. कक्षा दीर्घ करीत आता ते 36,500 किमीवरून 42 हजार किमीच्या कक्षेत पोहचले आहे. आपल्या पृथ्वीच्या पाच ऑर्बिट ( प्रदक्षिणा ) केल्यानंतर त्याचे चंद्राजवळची कक्षा वाढवत नेली जाणार आहे.

31 जुलै रोजी पृथ्वीपासून 10 पट दूर

चंद्रयाननंतर 31 जुलै रोजी पृथ्वीपासून 10 पट दूर गेलेले असेल तर संशोधक त्याच्या चंद्राच्या बाजूकडील कक्षेत टप्प्या टप्प्याने वाढ करीत आहेत. एका क्षणी ते एक किलोमीटर अंतरावर पोहचल्यानंतर वैज्ञानिक त्याला चंद्राच्या ऑर्बिटमध्ये ढकलतील. पृथ्वीपासून चंद्र 3 लाख 84 हजार 400 किमीवर अंतरावर आहे.

असा  होत आहे चंद्रयान-3 चा प्रवास

17 ऑगस्टला लॅंडरपासून प्रोपल्शन मॉड्यूल वेगळे 

इतक्या प्रवासानंतर 5-6 ऑगस्टला चंद्रयान चंद्राच्या कक्षेत गेलेले असेल, त्यानंतर चंद्रयानच्या प्रोपल्शन यंत्रणेला सुरु केले जाईल. आणि त्याला पुढे ढकलेले जाणार आहे. म्हणजे चंद्राच्या 100  किमी कक्षेत पाठविले जाणार आहे. 17 ऑगस्टला प्रोपल्शन सिस्टम चंद्रयानच्या लॅंडर आणि रोव्हरपासून वेगळे होईल. त्यानंतर त्याला चंद्राच्या 100 बाय 30 किमीच्या कक्षेत आणले जाणार आहे.

आता खरी कसोटी सुरु 

23 ऑगस्टला त्याचा वेग कमी केला जाईल. हे कठीण काम असणार असून येथून त्याची लॅंडींग सुरु होईल. यंदा लॅंडींग क्षेत्रफळ चंद्रयान-2 पेक्षा वाढविले आहे. विक्रम लॅंडरच्या पायाच्या ताकदीत वाढ केली आहे. नवीन सेंसर्स लावले आहेत. जर चुकीच्या जागी लॅंडींग झाली तर पुन्हा जागच्या जागी हॉवरक्राफ्टप्रमाणे ते पुन्हा हवेत उचलून दुसऱ्या चांगल्या जागी लॅंडींग करण्याचाही पर्याय ठेवण्यात आला आहे. मागच्या मोहिमेतून हा धडा इस्रोने घेतला आहे.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.