फुग्याला शत्रू समजून बसला साप, नंतर जे झालं… चकीत करणारा VIDEO

सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडीओ व्हायरल होत आहे. खरं तर, सापाने एका फुग्याला आपला शत्रू समजले आणि त्यावर हल्ला करायला सुरुवात केली. एक साप शांत बसला होता, पण दुसरा साप चिडून...

फुग्याला शत्रू समजून बसला साप, नंतर जे झालं... चकीत करणारा VIDEO
Snake Video
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 19, 2025 | 5:29 PM

साप सहसा कोणावरही हल्ला करत नाहीत, पण त्यांना एखाद्या गोष्टीचा धोका वाटला तरच ते हल्ला करतात. म्हणूनच असं म्हणतात की सापांना विनाकारण त्रास देऊ नये, नाहीतर ते आपल्या खतरनाक रूपात येतात. सापांचा राग किती धोकादायक असतो, याचं जिवंत उदाहरण नुकत्याच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत दिसलं. खरं तर, एक साप फुग्लाला शत्रू समजतो आणि मग तो जे काही करतो, ते पाहून तुम्ही खरोखर थक्क व्हाल. या व्हिडीओने इंटरनेटवर खळबळ माजवली आहे.

नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, साप फणा काढून जमिनीवर बसला आहे आणि फुसफुसत आहे. याचवेळी एक व्यक्ती सापासमोर एक फुगा आणतो. बस, मग काय, साप आणखी चिडतो. काही क्षण तो फुगा टक लावून पाहतो आणि मग एका झटक्यात आपल्या फणाने त्यावर जोरदार दंश करतो. तो अनेक वेळा फुग्यावर हल्ला करतो, पण फुगा फुटत नाही, मात्र त्याच्याशेजारी शांत बसलेल्या दुसऱ्या सापाने एका झटक्यात फुगा फोडला आहे. फुगा फुटताच पहिला साप घाबरतो. हा नजारा खूपच मजेदार, पण आश्चर्यकारक आहे.

वाचा: गुरू गोचरामुळे या 3 राशींना होईल महालाभ, मिळणार कुबेरांचा आशीर्वाद

सापाने फुग्यावर केला जोरदार हल्ला

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वर @NaeemAh78347923 या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये ‘जेव्हा फुग्याला शत्रू समजून बसला साप. एक सक्रिय हल्लाखोर, एक शांत निरीक्षक’. अवघ्या १५ सेकंदांच्या या व्हिडीओला आतापर्यंत ५५ हजारांहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे, तर शेकडो लोकांनी व्हिडीओला लाइक केलं आहे. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

व्हिडीओ पाहून एका युजरने लिहिलं आहे, ‘भाऊ, फुगा पाहून सापाची रिअ‍ॅक्शन खूपच मजेदार होती. वाटतंय त्याचा लीडर कन्फ्युजन कुमार आहे, जो नेहमी चुकीचे निर्णय घेतो’, तर दुसऱ्या युजरने लिहिलं आहे, ‘शांत बसलेला साप तर खूपच धोकादायक निघाला. याने ताबडतोब लक्ष्य निश्चित करून हल्ला केला. शांत बसणारा खूपच धोकादायक आहे’. दरम्यान, अनेक युजर्सनी याला आतापर्यंतचं ‘सर्वात मजेदार निसर्गाचं क्षण’ असं म्हटलं आहे.