AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video: अचानक सिंह आडवा आल्यावर काय होणार? दातखिळी बसली की राव, बोलताही येईना आणि हालता ही…. काय झाले पाहाच एकदा

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ काही सेकंदांचा आहे, पण त्यात दिसणारे दृश्य खरोखरच श्वास रोखून ठेवणारे आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जंगल सफारीदरम्यान कार एका ठिकाणी थांबते.

Viral Video: अचानक सिंह आडवा आल्यावर काय होणार? दातखिळी बसली की राव, बोलताही येईना आणि हालता ही.... काय झाले पाहाच एकदा
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 20, 2022 | 6:17 PM
Share

Viral Video: अनेकांना मनमुराद हुंदडायला आवडतं. त्यासाठी कोणी समुद्र किनारी तर कोणी दऱ्याखोऱ्यात जातो तर कोण थेट अभयारण्यात (Sanctuary). आपल्याकडेही असे अनेक जन आहेत ते जंगल सफारीवर जातात. वन्यजीवांच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासह वन्य प्राण्यांनाही (wildlife) जवळून पाहण्याची संधी यातून मिळते. त्यामुळे यापेक्षा चांगला पर्याय कोणताच असू शकत नाही. तर आपल्याकडे वाघ पाहिला हे सांगणारे किती खुश असतात. पण जर वाघाऐवजी तुमच्यासमोर सिंह आला तर आणि त्यावेळी गाडीच्या समोर असणाऱ्या ट्रॅकर सीटवर तुम्ही एकटेच बसला असाल तर मग काय होईल? सिंहाला (lion)अगदी जवळून पाहिल्यावर तुमची अवस्था कशी होईल हे उघड आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे, ज्यामध्ये एक सिंह पर्यटकांच्या वाहनांच्या अगदी जवळ पोहोचतो. व्हिडिओमध्ये ट्रॅकर सीटवर बसलेल्या रेंजरची अवस्था पाहण्यासारखी आहे.

View this post on Instagram

A post shared by WildTrails.in (@wildtrails.in)

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ काही सेकंदांचा आहे, पण त्यात दिसणारे दृश्य खरोखरच श्वास रोखून ठेवणारे आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जंगल सफारीदरम्यान कार एका ठिकाणी थांबते. पर्यटक आपले कॅमेरे काढून इकडून तिकडे फोटो काढतात. दरम्यान एक अशी घटना घडते ज्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात. आपण पाहू शकता की एक सिंह ट्रॅकर सीटवर बसलेल्या रेंजरच्या अगदी जवळ येतो. यानंतर तो इतका घाबरतो की तो आपल्या जागेवरून हलतही नाही. यादरम्यान सिंहाचे डोळे पाहण्यासारखे असतात. मात्र, पुढे काय झाले हे कळत नाही कारण हा व्हिडिओ येथेच संपलेला आहे.

wildtrails.in नावाच्या पेजवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, जर तुम्ही ट्रॅकर सीटवर असता तर तुम्ही काय कराल? पण हा व्हिडिओ पाहून बहुतेक युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. एका युजरवर कमेंट करताना लिहिले की, सिंहाचे डोळे त्या व्यक्तीकडे किती रागाने बघत आहेत हे दाखवतात. त्याचवेळी आणखी एका यूजरने कमेंट करताना लिहिले आहे की, सिंहाला भूक लागली नसेल, त्यामुळे त्याने हल्ला नाही केला. त्याचप्रमाणे, व्हिडिओ पाहिल्यानंतर बहुतेक युजर्स आश्चर्य व्यक्त करत आहेत.

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.