असा जॉब हवा का ? ऑफीसमध्ये 8 तास मस्त ताणून द्या आणि 10 लाख पगार मिळवा, असा करा अर्ज

एका ड्रीम जॉबची खूपच चर्चा सुरु आहे. या जॉबमध्ये तुम्हाला झोपण्याचे दहा लाख वेतन मिळणार आहे. ज्यांना झोपायची आवड आहे. किंवा संधी मिळताच जे एक डुलकी काढतात त्यांच्यासाठी तर हा जॉब खुपच महत्वाचा आहे.

असा जॉब हवा का ? ऑफीसमध्ये 8 तास मस्त ताणून द्या आणि 10 लाख पगार मिळवा, असा करा अर्ज
dream job offer
Follow us
| Updated on: Sep 05, 2024 | 2:52 PM

कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता, कहीं ज़मीन कहीं आसमाँ नहीं मिलता…प्रत्येकाला दुसऱ्याची नोकरी चांगली वाटत असते. प्रत्येकाचा ड्रीम जॉब काय असेल माहिती नाही. परंतू लाईफ मजेत जाण्यासाठी खूपच कमी लोकांना मनाप्रमाणे जॉब मिळत असतो. एक नवा जॉब सध्या खूपच व्हायरल होत आहे. या जॉबमध्ये आपल्याला काही काम करायचे नाही. तर केवळ झोपायचे काम आहे. आपल्याला झोपण्याचे कंपनी 10 लाख वेतन देणार आहे.तर पाहूया नेमका काय हा जॉब आहे.आणि अर्ज कसा करायचा ते…

या मजेशीर जॉबची ऑफर इंडियन होम एण्ड स्लीप सॉल्यूशन बँड Wakefit ने आणली आहे.ज्यांना झोपायला आवडते त्यांना या जॉबची ऑफर खूपच आकर्षक वाटू शकते. वेकफीट यांनी स्लीप इंटर्नशिप देखील सुरु केली आहे. त्यासाठी कंपनी 10 लाख रुपये मोजायला देखील तयार आहेत.

या इंटर्नशिपच्या अटी मोठ्या मनोरंजक आहे. निवडक उमेदवारांना रोज 8-9 तास झोपावे लागणार आहे. आणि दिवसांची 20 मिनिटांची ( पॉवर नॅप ) दुपारची डुलकी घेणे हा सुद्धा इंटर्नशिपचा भाग आहे. यासोबत तुम्हाला मोफत एक गादी देखील भेट दिली जाणार आहे.ज्यावेळ तुम्ही आरामात झोपेचा आनंद घेऊ शकता.

या अनोख्या जॉबसाठी तुम्हाला जास्त शिकलेले असण्याची देखील आवश्यकता नाही. या जॉबची केवळ एकच अट आहे ती म्हणजे तुम्हाला झोप खूप प्रिय असायला हवी. निवडलेल्या इंटर्नला एक लाख रुपये मिळणार आहेत. आणि स्लीप चॅंपियन झाल्यास दहा लाखापर्यंत मिळू शकतात. तर करताय ना अर्ज…

कसा करायचा अर्ज ?

तुम्ही Wakefit वेकफिटच्या वेबसाइटवर  किंवा  या ब्रॅंडच्या लिंक्डइन प्रोफाईलवर जाऊन देखील  तुम्ही  या जॉबसाठी अर्ज करू शकता. Wakefit  ही गादी, उशा किंवा इतर झोपेच्या संबंधित उत्पादने बनविणारी कंपनी आहे. त्यामुळे या ऑफरमागे एक मार्केटिंग स्टंट देखील असू शकतो असे म्हटले जात आहे. या मागे लोकांचे लक्ष आकर्षित करण्याचा देखील हा फंडा असू शकतो. अनेकदा कंपन्या आपल्या उत्पादनाकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी या प्रकारच्या क्रिएटिव्ह कॅंपेनचा उपयोग करतात.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.