काय आहे ‘पर्सनॅलिटी राइट्स’? ज्या अंतर्गत अमिताभ बच्चन यांचे नाव,आवाज आणि चेहरा वापरण्यासाठी घ्यावी लागणार परवानगी

पर्सनॅलिटी राइट्समुळे यापुढे अमिताभ बच्चन यांचा आवाज, नाव आणि चेहरा वापरण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. हे पर्सनॅलिटी राईट्स काय आहे जाणून घेऊया.

काय आहे पर्सनॅलिटी राइट्स? ज्या अंतर्गत अमिताभ बच्चन यांचे नाव,आवाज आणि चेहरा वापरण्यासाठी घ्यावी लागणार परवानगी
अमिताभ बच्चन
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 26, 2022 | 2:31 PM

मुंबई,  बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आवाज जगभरात प्रसिद्ध आहे. विशेषतः कोरोना काळात लसीकरणाचे आवाहन करण्यासाठी अमिताभ बच्चन यांचाच आवाज निवडण्यात आला होता. बऱ्याच वेळेस त्यांचा डमी आवाज किंवा चेहरा सर्रास वापरल्या जातो मात्र आता यापुढे  यांचे नाव, फोटो, आवाज किंवा व्यक्तिमत्त्व कोणत्याही व्यक्ती किंवा संस्था कोणत्याही प्रकारे वापरू शकत नाही. म्हणजेच आता असे करण्यासाठी त्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने हा निर्णय व्यक्तिमत्व अधिकारांतर्गत दिला आहे. ज्याला इंग्रजीत पर्सनॅलिटी राईट्स (Personality Rights) असे म्हणतात.  हे व्यक्तिमत्व अधिकार कोणते आहेत आणि त्यासाठी कोण नोंदणी करू शकतात हे जाणून घेऊया.

काय आहेत व्यक्तिमत्व हक्क?

आपण अनेक प्रकारच्या अधिकारांबद्दल ऐकले आहे किंवा वाचले आहे परंतु हे व्यक्तिमत्व अधिकार काय आहे याबद्दल जाणून घेऊया. वास्तविक, व्यक्तिमत्व हक्क व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित असतात. जर कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीला वाटत असेल की त्यांची ओळख आणि वैशिष्ट्ये अनावश्यकपणे वापरली जात आहेत तर तो या अंतर्गत नोंदणी करू शकतो.

काय आहे कायद्यातील तरतूद?

कायद्यात व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचा फारसा उल्लेख नाही. तो गोपनीयतेच्या अधिकाराचा एक भाग मानला जातो. प्रसिद्ध लोकांसाठी हा एक अतिशय महत्त्वाचा अधिकार आहे. लोकं त्यांच्या गुणांचा किंवा त्यांच्या वैशिष्ट्यांचा गैरवापर करतात आणि त्यातून पैसे कमावतात. अशा परिस्थितीत प्रसिद्ध व्यक्ती व्यक्तिमत्व अधिकारांतर्गत त्यांची नावे नोंदवू शकतात. भारतीय कायद्यातील व्यक्तिमत्व हक्क भारतीय संविधानाच्या कलम 21 मध्ये गोपनीयता आणि प्रसिद्धीशी संबंधित अधिकारांचा समावेश आहे. म्हणजेच व्यक्तिमत्व हक्कांभोवती एक कायदा आहे. त्याच वेळी, याशिवाय, बौद्धिक संपदा कायद्यात व्यक्तिमत्व अधिकारांबाबत घटनात्मक अधिकार आहेत. या अंतर्गत कॉपीराइट कायद्याची तरतूद आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती की, अनेक कंपन्या त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचे नाव, आवाज आणि व्यक्तिमत्त्व वापरत आहेत. आणि हे बऱ्याच काळापासून होत आहे. काही कंपन्या अमिताभ बच्चन यांचे नाव, आवाज आणि व्यक्तिमत्त्वाचा चुकीच्या पद्धतीने वापर करत आहेत. जे हे करत आहेत ते चुकीचे असल्याचे बच्चन यांनी याचिकेत म्हटले आहे. व्यावसायिक उद्योगात त्यांचे नियंत्रण केले पाहिजे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अमिताभ बच्चन यांच्या नावाने एक लॉटरीची जाहिरातही चालू आहे, जिथे त्यांचा फोटो प्रमोशनल बॅनरवर प्रदर्शित झाला आहे. याशिवाय त्यावर KBC चा लोगोही आहे. हे बॅनर लोकांची दिशाभूल करण्यासाठी कोणीतरी तयार केले आहे. यात अजिबात तथ्य नाही.

काय आहेत न्यायालयाचे आदेश?

याप्रकरणी अमिताभ बच्चन यांना दिलासा मिळाला आहे. न्यायमूर्ती चावला यांनी प्राधिकरण आणि दूरसंचार विभागाला अमिताभ बच्चन यांचे नाव, फोटो आणि व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये तात्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत जे सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत. याशिवाय बच्चन यांच्या नावाचा आणि आवाजाचा बेकायदेशीर वापर करणाऱ्या फोन नंबरची माहिती देण्यास कोर्टाने दूरसंचार सेवा प्रदात्यांना सांगितले आहे. याशिवाय इंटरनेट सेवा पुरवठादारांना बच्चन यांच्या व्यक्तिमत्त्वाचे हक्क खराब करणाऱ्या ऑनलाइन लिंक्स काढून टाकण्यासही सांगण्यात आले आहे.