
नेपाळमधील जेन झी म्हणजेच जनरेशन झेड आंदोलकांनी देशातील सरकार पाडले आहे. जेन झी समुदायाने या आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यामुळे सरकार पाडण्याची शक्ती असणारे जेन झी म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. जेन झी ही राजकीय, सामाजिक किंवा सांस्कृतिक संघटना नाही, ही एका पिढीसाठी वापरली जाणारी संज्ञा आहे. ही संज्ञा काय आहे? यात कोणत्या तरुणांचा समावेश होतो? वेगवेगळ्या काळात जन्मलेल्या लोकांना कोणकोणत्या संज्ञा आहेत याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जनरेशन झेड किंवा जेन झी म्हणजे 1997 ते 2012 या काळात जन्मलेली मुले. या 15 वर्षात जन्मलेल्या पिढीला जनरल झेड म्हणतात. सध्या जगात जेन झी ची लोकसंख्या सुमारे 30 टक्के आहे. म्हणजेच ही तरूण लोकसंख्या आहे, ज्यांच्यावर जगाला पुढे नेण्याची जबाबदारी आहे. या पिढीच्या कामाचा किंवा आंदोलनाचा परिणाम समाज आणि अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे.
जेन झी ही पिढी इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात मोठी झाली आहे, हे लोक केवळ तंत्रज्ञानाने नव्हे तर सामाजिक मुद्द्यांवर जागरूक आणि सक्रिय आहेत. ही सर्वात जास्त चर्चेत असणारी पिढी आहे. तंत्रज्ञानाच्या काळात हे लोक नवीन अॅप्स आणि सोशल मीडियावरील ट्रेंड खूप लवकर स्वीकारतात.
जेन झी पिढी केवळ सोशल मीडियावर नव्हे तर भविष्याच्या दृष्टीने खूप सतर्क आहे. एका सर्वेक्षणानुसार जवळपास 2 तृतीयांश जेन झी तरुणांनी 19 वर्षांच्या वयात बचत करायला सुरुवात केली. या पिढीसमोर नोकऱ्यांमधील अस्थिरता घर खरेदीची चिंता आणि वाढता खर्च ही आव्हाणे आहेत. या पिढीमध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी अतिरिक्त काम करण्याचा ट्रेंड वाढला आहे. या समाजाचा मोबाइलवर जास्त विश्वास आहे. हे लोक डेस्कटॉपपेक्षा मोबाईलवर जास्त काम करतात. 80
टक्क्यांपेक्षा जास्त लोक ऑनलाईन उत्पादने खरेदी करण्यावर विश्वास ठेवतात.
जनरल-झेड या पिढीने आपले आयुष्य तंत्रज्ञान आणि आधुनिक उपकरणांसोबत सुरु केले आहे. त्यामुळे या लोकांना तंत्रज्ञानाचा राजा म्हटले जाते. या लोकांची सुरुवात तंत्रज्ञानापासून झाली होती. त्यामुळे या पिढीला जनरेशन-झेड म्हणतात.