सोने खरेदी करताना त्याची शुद्धता नक्की तपासा, मोबाईलवरुन लगेच होईल काम
धनत्रयोदशीच्या दिवशी देखील अनेक जण सोनं खरेदी करतात. पण सोनं खरेदी करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा.. सोनं शुद्ध आहे की नाही... नक्की तपासा... मोबाईलवरुन लगेच होईल काम

दिवाळी म्हटलं की अनेक नवीन वस्तूंची खरेदी आपण करतो.. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोन… असं जण दिवाळीच्या दिवशी सोन्याची खरेदी करतात. सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर, धनत्रयोदशीच्या दिवशी देखील अनेक जण सोनं खरेदी करतात. धनत्रयोदशीच्या आधी आणि त्या दिवशी सोने आणि चांदीची मागणी सर्वाधिक असते. त्यामुळे त्यांच्या किमती शिगेला पोहोचतात. सोनं खरेदी करण्यासाठी अनेक सोन्याच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी असते. पण सोनं खरेदी करण्याआधी तुम्ही सोनं किती शुद्ध आहे, याची तपासणी करता का? सोनं किती शुद्ध आहे, ते पडताळून घेणं फार महत्त्वाचं आहे.
दिवाळीची सुरवात धनत्रयोदशीपासून होते, जी संपत्ती, सौभग्य आणि समृद्धीचं प्रतीक मानली जााते… सोने – चांदी, नवीन भांडी किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे.. जर तुम्ही या दिवाळीत सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, फसवणूक टाळण्यासाठी खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता आणि हॉलमार्क तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
दिवाळीत सोनं खरेदी करण्याच्या गर्दीत किंवा अनेकदा बनावट सोनं विकलं जातं… जसं की बनावट हॉलमार्क, लपवलेले उत्पादन शुल्क. म्हणून सोनं खरेदी करण्याआधी काही गोष्टींचा काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आजच्या बाजारपेठेत, जिथे खूप पर्याय उपलब्ध आहेत… तिथे सोन्याची शुद्धता तपासणे महत्त्वाचे आहे.
सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजली जाते. 24 कॅरेट सोनं हे सर्वात शुद्ध सोनं असतं. तर 14 ते 22 कॅरेट सोनं सामान्यतः दागिने बनवण्यासाठी वापरलं जातं… सोन्याचे हॉलमार्किंग आता अनिवार्य असलं तरी, खरेदीकारांनी नेहमीच खात्री करावी की दागिन्यांवर हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक असला पाहिजे.
सोन्याची शुद्धता तपासण्याचा सर्वात विश्वासार्ह मार्ग म्हणजे भारतीय मानक ब्यरो (BIS) चा हॉलमार्क आता BIS हॉलमार्क हे भारतातील मानक आहे… सर्व हॉलमार्क केलेल्या दागिन्यांवर 6 अंकी अल्फान्यूमेरित HUID कोड असतो. तुम्ही हे BIS केअर मोबाईल अॅपवर तपासू शकता. फक्त कोड एंटर करा आणि तुम्हाला त्वरित माहिती मिळेल, त्यावर ज्वेलर्सचे नाव आणि नोंदणी, हॉलमार्किंग सेंटर, दागिन्यांचा प्रकार आणि सोन्याची शुद्धता दिसेल.
आज किती आहेत सोने आणि चांदीचे दर
आज सोन्याच्या भावात घट झाली आहे. सोन्याचे दर 5 हजारांनी घटले आहेत. 1 लाख 36 हजार रुपये सोन्याचे दर होते. आता ते 1 लाख 30 हजार रुपयांवर पोहोचले आहे. चांदीच्या दरात प्रति किलो 25 हजार रुपयांची घट झाली आहे. 1 लाख 95 हजार किलोहून चांदी 1 लाख 70 हजार रुपयांवर पोहोचली आहे.
