Video: बाईक चालवताना गर्लफ्रेंडला टाकीवर बसवलं, व्हिडीओ व्हायरल होताचं, पोलिसांनी…

Video: गर्लफ्रेंडला टाकीवर बसवून गाडी चालवणं प्रियकराला पडलं महागात, व्हिडीओ पाहून पोलिसांनी...

Video: बाईक चालवताना गर्लफ्रेंडला टाकीवर बसवलं, व्हिडीओ व्हायरल होताचं, पोलिसांनी...
व्हिडीओ पाहून पोलिसांनी...
Image Credit source: twitter
| Updated on: Jan 03, 2023 | 1:07 PM

आंध्रप्रदेश : सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ (Viral Video)चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये कपल बाईकवर रोमांस करीत असल्याचं स्पष्ट दिसतं आहे. तो व्हिडीओ आंध्र प्रदेश (Andra Pradesh) राज्यातील असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. प्रियकराने प्रेयसीला चक्क गाडीच्या टाकीवर बसवली आहे. त्यामुळे तो व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. व्हिडीओ इतका व्हायरल झाला आहे, की पोलिसांनी प्रियकर आणि प्रेयसी यांच्यावरती कारवाई केली आहे.

ज्यावेळी कपल बाईकवरती रोमांस करीत होते. त्यावेळी त्यांचा व्हिडीओ एकाने मोबाईलमध्ये कैद केला आहे. त्या व्हिडीओमध्ये बाईकच्या टाकीवर प्रेयसीला बसवलं होतं. तसेच दोघांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घातले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.

आंध्र प्रदेशातील हैरतअंगेज अंदाज या परिसरातील हा व्हिडीओ असून ज्यावेळी पोलिसांच्याकडे हा व्हिडीओ गेला. त्यावेळी त्यांनी तरुणाला आणि तरुणीला ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर कडक कारवाई देखील केली आहे.

विशाखापट्टनमचे पोलिस आयुक्त सीएच श्रीकांत यांनी दोघांच्या आई-वडिलांना पोलिसांनी बोलावून घेतले होते. त्यानंतर दोघांनाही समज दिली असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. जो कोणी नियमांचं उल्लंघन करेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी जाहीर केलं आहे.