AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सापाचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिला का?, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही प्रेमात पडाल!

एरव्ही सापाला पाहून लोकांच्या हातापायाला घाम फुटतो. मात्र व्हिडिओमधील साप बघण्यासाठी लोक आवर्जून इंटरनेटमध्ये डोकावत आहेत. बरेचसे साप बिनविषारी असतात. हा सुंदर साप त्यापैकीच एक मानला जात आहे.

सापाचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिला का?, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही प्रेमात पडाल!
सफेद सापाचा व्हिडिओ व्हायरलImage Credit source: social media
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Oct 24, 2022 | 3:53 PM
Share

मनुष्यवस्तीत असो किंवा जंगलात. कुठेही साप दिसला तरी आपण ‘बापरे’ अशीच प्रतिक्रिया देतो. प्रत्येकाच्या मनात सापाविषयी भयंकर भीती आहे. त्यामुळे दूर अंतरावर जरी साप दिसला तरी माणसाला धडकी भरते. काहींना तर व्हिडिओमध्ये साप पाहणे देखील नकोसे वाटते. सध्या अशा एका सापाचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल (Snake video Viral on Social Media) झाला आहे, जो व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना भीती वाटण्याऐवजी त्या सापाबद्दल आश्चर्य (Surprise) वाटते. याचे कारण म्हणजे हा साप अत्यंत सुंदर (Beautiful Snake) असून, लोक त्याला घाबरण्याऐवजी त्याच्या सौंदर्यावर प्रेम करत आहेत.

लोक आवर्जून इंटरनेटमध्ये डोकावताहेत

सोशल मीडियामध्ये प्राण्यांचे अनेक खतरनाक व्हिडिओ व्हायरल होतात. सध्या व्हायरल झालेला सापाचा व्हिडिओ मात्र याला अपवाद ठरला आहे. कारण या व्हिडिओमधील साप अत्यंत सुंदर असून तो लोकांना घाबरवण्याऐवजी प्रेमात पाडत आहे.

एरव्ही सापाला पाहून लोकांच्या हातापायाला घाम फुटतो. मात्र व्हिडिओमधील साप बघण्यासाठी लोक आवर्जून इंटरनेटमध्ये डोकावत आहेत. बरेचसे साप बिनविषारी असतात. हा सुंदर साप त्यापैकीच एक मानला जात आहे.

जगभर सापाच्या 2 हजारांपेक्षा अधिक प्रजाती

संपूर्ण जगभरात सापाच्या जवळपास दोन हजारांपेक्षा अधिक प्रजाती आहेत. मात्र सर्व साप विषारी नसतात, असे तज्ञांनी म्हटले आहे. सुंदर सापाचा व्हिडिओ instagram वर ‘ब्यूटिफुल न्यू पिक्स’ या नावाने असलेल्या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. सापाच्या सुंदर लूकवर अनेक लोक घायाळ झाले आहेत.

सापाच्या पांढऱ्या शुभ्र रंगाने अनेकांना आकर्षित केले

आतापर्यंत आपण काळा, करडा, हिरवा अशा विविध रंगांचा साप पाहिला असेल. मात्र सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओतील सापाचा पांढरा शुभ्र रंग दुर्मिळ स्वरूपातील मानला जात आहे. व्हायरल व्हिडिओमधील साप पांढरा शुभ्र रंगाचा आहे आणि त्याने हिरव्यागार जंगलामध्ये फणा पसरला आहे. त्याला या रूपात पाहताना अनेक सर्पप्रेमींना आवडत आहे.

अजगरसारखा अवाढव्य दिसणारा साप

हा साप कोणत्या प्रजातीमधील आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अजगरसारखा अवाढव्य दिसणारा हा साप अजगरच्याच प्रजातींपैकी असावा, असा अंदाज काहींनी वर्तवला आहे. व्हायरल व्हिडिओला दाद देताना लोक वेगवेगळे तर्कवितर्क लढवत आहेत.

सोशल मीडियामध्ये या सापाच्या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणावर लाईक आणि कमेंट्स नोंदवल्या जात आहेत. सापाच्या दुर्मिळ प्रजाती पाहून खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?