AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPI ते WhatsApp यामध्ये वापरला जाणारा पहिला QR कोड कोणी तयार केला? जाणून घ्या यामागील रंजक कहाणी

तुम्ही कधी विचार केला आहे का की QR कोड प्रथम कोणी तयार केला आणि कधी, तुम्ही UPI पेमेंट करण्यासाठी स्कॅन करता? हे शक्य आहे की अनेकांना या प्रश्नाचे उत्तर माहित असेल, परंतु अजूनही बरेच लोकं आहेत ज्यांना या प्रश्नाचे उत्तर माहित नाही. QR कोडची कल्पना कुठून आली ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात...

UPI ते WhatsApp यामध्ये वापरला जाणारा पहिला QR कोड कोणी तयार केला? जाणून घ्या यामागील रंजक कहाणी
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: May 04, 2025 | 2:39 PM
Share

ऑनलाईन आणि आधुनिकतेच्या या जगात आपण देशभरात कुठेही गेलो तरी ऑनलाईन मार्फत सगळया गोष्टी खरेदी करत असतो. कारण पेमेंट करण्यापासून ते ऑनलाईन बुकिंगपर्यंत आपण मोबाईलद्वारे UPI Payment करत असतो. UPI पेमेंटपासून ते WhatsApp वेब चालवण्यापर्यंत सर्वत्र QR कोड वापरला जातो. क्यूआर कोडची एक खास गोष्ट म्हणजे तो जेव्हा जेव्हा तयार केला जातो तेव्हा तो वेगवेगळ्या पद्धतीने जनरेट होत असतो कारण प्रत्येक कोड एकमेकांपासून वेगळा असतो. पण सर्व कामे सोपी करणारा हा QR कोड कोणी तयार केला हे तुम्हाला माहिती आहे का? आज आम्ही तुम्हाला QR कोडमागील रंजक कहाणी सांगणार आहोत.

QR कोड कोणी आणि केव्हा तयार केला?

आज, तुम्हाला UPI पेमेंट करायचे असेल किंवा WhatsApp वेब वापरण्यासाठी QR कोड स्कॅन करायचा असेल, ही सर्व कामे सोपी करणारी QR कोड तंत्रज्ञान सुमारे 31 वर्षांपूर्वी शोधण्यात आले होते. QR कोडमध्ये QR चा पूर्ण फॉर्म Quick Response आहे. या कोडचा शोध 1994 मध्ये जपानी अभियंता मासाहिरो हारा यांनी लावला होता आणि त्यानंतर टोयोटा मोटर कॉर्पोरेशनची उपकंपनी असलेल्या डेन्सो वेव्हने या कोडचा विकास पूर्ण केला.

क्यूआर कोडची कल्पना कुठून आली?

जपानी अभियंता मासाहिरो हारा गो गेम खेळत असताना क्यूआर कोडची कल्पना सुचली. ज्यांनी हा गेम खेळला नाही त्यांच्या माहितीसाठी आपण जाणून घेऊयात कीया गेममध्ये 19×19ग्रिड आहे जे काळ्या आणि पांढऱ्या रंगात दिसतात.

गेम खेळत असताना त्यांना कल्पना आली की क्यूआर कोडमध्ये बरीच माहिती साठवता येते. कल्पना सुचल्यानंतर मासाहिरो हारा यांनी त्यांच्या कल्पनेला आकार देण्यासाठी डेन्सो वेब टीमशी हातमिळवणी केली आणि ग्रिड सिस्टमचे QR मध्ये रूपांतर करण्याचे काम पूर्ण झाले. सुरुवातीला ऑटोमोबाईल उद्योगाने भागांना लेबल करण्यासाठी याचा वापर केला होता, परंतु आता सर्वत्र क्यूआर कोड वापरले जात आहेत.

सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.