ना बटन, ना जिप… तरीही साऊथ इंडियन लोक लुंगी का घालतात? देशातील 99 टक्के लोकांना कारण माहीतच नाही
भारतीय कपड्यांची ताकद इतकी आहे की जगभरातील प्रमुख ब्रँड त्याची नक्कल करत आहेत. साडी, ओढणी, सूट आणि अगदी लुंगीपासून ते प्रत्येकाची स्वतःची कहाणी आहे. तुम्ही "लुंगी डान्स" हे गाणे अनेक वेळा ऐकले असेल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या लुंगीची कहाणी किती जुनी आहे?

दक्षिण भारतात गल्ली-बोळात लोक लुंगी घालताना दिसतात. अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये याचा उल्लेख झालाय. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आणि यो यो हनी सिंह सारख्या स्टार्सनीही लुंगी घालून डान्स केला आहे. पण ही साधीशी लुंगी इतकी खास का आहे की ती भारताच्या संस्कृतीचा भाग बनली? मजेदार गोष्ट म्हणजे, लुंगीची सुरुवात फॅशनशी काहीच संबंधित नव्हती. चला जाणून घेऊया याविषयी सविस्तर…
लुंगीची सुरुवात गरजेपोटी झाली आहे. याचा संबंध मच्छिमारांशीही आहे. आजही ते वर्षानुवर्षे जुन्या पद्धतीने लुंगी घालतात. पण लुंगीला कमी लेखण्याची चूक करू नका. कारण त्याच्या खासियतींची यादी खूप लांब आहे. चला, लुंगीशी संबंधित काही रोचक गोष्टी जाणून घेऊया…
लुंगीची सुरुवात कधी झाली?
असे मानले जाते की लुंगी सहाव्या शतकाच्या आसपास दक्षिण-पूर्व आशियातील व्यापाऱ्यांमार्फत आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूत पोहोचली. आणि नंतर हळूहळू संपूर्ण भारतात तिने आपली जागा निर्माण केली. भारताबरोबरच बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान अशा अनेक देशांमध्येही अनेक वर्षांपासून लुंगी घातली जाते. आरामदायक कापड असल्याने लोकांना ती अगदी परफेक्ट वाटते.
पूर्वी लुंगी वेगळ्या पद्धतीने बनवली जायची
आज लुंगी बनवण्याच्या अनेक नव्या पद्धती समोर आल्या आहेत. पण पूर्वी बारीक मलमलच्या कापडाचे ३६ इंचाचे चौकोनी तुकडे करून घेतले जायचे. नंतर त्यावर लाकडी ब्लॉक आणि नैसर्गिक रंगांनी छपाई केली जायची. आता बाजारात बहुतेक मशीनने बनवलेल्या चेक प्रिंटच्या लुंगीच दिसतात.
मच्छिमारांशी आहे लुंगीचा संबंध
मच्छिमारांना तापणाऱ्या उन्हातही दिवस-रात्र काम करावे लागते. वारंवार त्यांचे कपडे ओले होतात. अशा वेळी त्यांनी लुंगी घालण्यास सुरुवात केली. गरजेप्रमाणे ते ती वर फोल्ड करून घेतात. आणि लुंगी ओली झाली तरी ती पटकन वाळते. म्हणून आजही बहुतेक मच्छिमार लुंगीतच दिसतात. लुंगी घालण्याची पद्धत तशी खूप जुनी आहे. आजकाल अनेकजण फॅशन म्हणूनही लुंगी घालू लागले आहेत.
