
तुम्ही भारतीय महिलांना दुचाकीवर बसताना एकांगी, एका बाजूला पाय मोकळे सोडून बसलेले पाहिले असेल. महिला दुचाकीवर मागे बसताना नेहमी एका बाजूने बसतात. आजही 1980 ते 1990 या काळात जन्मलेल्या महिला बाईकवर बसताना नेहमी असंच बसतात. पुरुष शक्यतोवर असं बसत नाही. पण महिला असं का बसतात? काही जण म्हणतील की साडी परिधान केल्यानं त्यांनं एकांगी बसावं लागतं. हे तात्पुरतं कारण आहे. कारण पंजाबी ड्रेस परिधान केलेल्या स्त्रीया सुद्धा असेच बसतात. याचं कारण ब्रिटिश इतिहासात दडलंय असं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला शिवाय राहणार नाही.
झेनिथ इरफान (zenithirfan) ही एक पाकिस्तानी युट्यूबर आहे. ती कंटेंट क्रिएटर आहे. तिचे इन्स्टाग्रामवर लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिने पाकिस्तान दुचाकीवरून पालथा घातला आहे. मुलीने बाईकर व्हावे अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. ते आता हयात नाहीत. पण झेनिथ वडिलांची ही इच्छा पूर्ण केली. तिने एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात महिला एकांगी दुचाकीवर का बसतात याविषयीचा खुलासा केला. दक्षिण आशियात खास करुन अफगाणिस्तान,पाकिस्तान, भारत, नेपाळ या देशात महिला दुचाकीवर एकांगी, एका बाजूने का बसतात याचं उत्तर तिने शोधलं.
काय आहे यामागील इतिहास
तर झेनिथच्या मते, पाकिस्तान, भारतात महिला दुचाकीवर एकांगी बसण्याची रीत सामान्य आहे. पण त्यामागे एक खास कारण आहे. हा इतिहास ब्रिटिशांशी संबंधित आहे. झेनिथच्या मते हा ट्रेंड 14-15 व्या शतकात सुरू झाला. प्रिंसेस ॲन ऑफ बोहेमिया ही घोडेस्वारी करायची. पण ती घोड्यावर एकाच बाजूने बसायची. कारण दोन पाय टाकून महिलांनी घोड्यावर बसणे अत्यंत असभ्य आणि परंपरेच्या विरुद्ध मानले जायचे. तिने 1600 किलोमीटरच्या परिसरात घोड्यावर एकांगी बसून रपेट मारली.
राणी लक्ष्मीबाईंचे दिले उदाहरण
मग झेनिथने ही परंपरा आपल्याकडे नसल्याचा दाखला दिला. ब्रिटिशांविरोधात लढताना राणी लक्ष्मीबाई यांनी मैदान गाजवले. त्या दोन्ही बाजूंनी पाय टाकून घोडेस्वारी करत. त्यांनी अनेक युद्ध लढली. अखेरच्या लढाईत ही त्या मागे हटल्या नाहीत. त्या इंग्रजांना शरण गेल्या नाहीत. पण नंतर भारतावर इंग्रजांचा अंमल सुरू झाला. ब्रिटिश महिला भारतात आल्या. तेव्हा ज्या नवीन दुचाकी आल्या. त्यावर त्या एकांगी बसत. त्यांची ही स्टाईल भारतीय महिलांनी आत्मसात केली. साडी परिधान करत असल्याने दोन पाय टाकून बसणे गैरसोयीचे होत असल्याने महिला मग एकांगी बसू लागल्या. पण पंजाबी ड्रेस घातलेल्या महिलाही एकांगीच बसत असल्याचे दिसून येते.